जळगाव : दिवाळी (Diwali 2023) सणाच्या निमित्ताने सोने खरेदी जोरात सुरु असून, नागरिकांनी यंदाच्या धनत्रयोदशीला (Dhanteras) सोने खरेदीची लयलूट केली आहे. जळगाव सुवर्णनगरीत (Jalgaon Gold Rate) तब्बल 150 कोटीहून अधिक रुपयांच्या सोन्याची, तर त्याहून अधिक चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. मागील वर्षापेक्षा ही रक्कम 20 टक्क्यांहून अधिक असल्याचंही सोने विक्रेत्यांनी (Gold Rate) सांगितलं. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत चांगलीच सोनेखरेदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


दिवाळीच्या सणात (Diwali Festival) धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदीला विशेष महत्व असते. या दिवशी ग्राहक थोडेफार का होईना सोने खरेदी करत असतो. जळगावच्या सुवर्णनगरीत हा उत्साह यंदाही पाहायला मिळाला. जळगावच्या सुवर्णनगरीमध्येही 150 कोटीहून अधिक रुपयांची सोन्याची तर त्याहून अधिक चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली झाली. मागील वर्षापेक्षा ही रक्कम 20 टक्क्यांहून अधिक असल्याचंही सोने विक्रेत्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे मागील वर्षी सोन्याचे दर हे 50 हजार रुपयांच्या घरात होते. यंदा तेच दर 60 हजार रुपयांच्या वर असतानाही खरेदीमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये नोकरदार, व्यापारी वर्गापासून सर्वच क्षेत्रातील ग्राहकांमध्ये सहभाग असल्याची माहिती सोने व्यावसायिकांनी दिली आहे.


जळगाव शहरात (Jalgaon) सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून येत असून धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. धनत्रयोदशीनंतर उद्या लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) असल्याने अनेकांनी सोने खरेदीचा मुहूर्त उद्यावर ढकलला आहे. यात अनेक ग्राहकांकडून जुन्या दागिन्यांची मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने खरेदी करण्यास पसंती दिली जात आहे. दरम्यान धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. जळगाव तब्बल वीस कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचं सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितलं. तर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर संपूर्ण देशभरात 29 हजार कोटीहून अधिक तर महाराष्ट्रात 450 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची सोन्याची उलाढाल झाली. 


सोने-चांदीच्या दरात घसरण


दरम्यान दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचा दरात घसरण झाली असून, मुंबईमध्ये (Mumbai Gold Rate) प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 60,600 रुपये आहे. सोमवारी मुंबईत सोन्याचा दर 61,090 रुपये होते. दिल्लीमध्ये सोन्याचा दर 60,750 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 61,090 रुपये आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 73,000 रुपये आहे. चांदीचा दर 1000 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. शुक्रवारी एक किलो चांदीचा दर 74,000 रुपये होता. तर महाराष्ट्रातील पुणे शहरात सोने दर 60600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त,  नाशिक - 60630 रुपये 510 रुपयांनी स्वस्त, नागपूर - 60600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त, कोल्हापूर - 60600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त असे दर आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Gold Silver Price Today : खुशखबर! ऐन दिवाळीत सोनं झालं स्वस्त; आजचे सोने-चांदीचे दर काय?