जळगाव : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) सातत्याने अवैध वाळू उत्खनना बाबत प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. मात्र, तरीदेखील प्रशासनाला न जुमानता अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रांताधिकाऱ्यांनी हद्दपारी आदेश काढल्यानंतर वाळू माफियाने थेट घरी जाऊन त्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. भूषण सपकाळे असे त्या माफियाचे नाव आहे.
प्रांताधिकारी महेश सुढळकर यांनी हद्दपार केल्याचे आदेश केले होते. हद्दपारी आदेश निघाल्याचे कळताच भूषण सपकाळेनं सुढळकर यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन हद्दपार का केले? असा जाब विचारत गोंधळ घातला. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर पोलिसांनी तातडीने घर गाठत गुन्हेगार भूषण सपकाळेस ताब्यात हद्दपार केलं. या घटनेनंतर संदर्भात प्रांत अधिकारी महेश सुधळकर यांच्या तक्रारीवरून रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी मंडल अधिकाऱ्यावर वाळू तस्करांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात रेती माफियांचा मुजोरी किती वाढली आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा आला. जळगाव शहरातील भूषण सपकाळे विरोधात अवैध रेती वाहतुकीसह (Illegal sand transport) विविध गुन्हे दाखल आहेत. यामुळे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यात भूषण सपकाळे याचाही समावेश आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav) उत्सवाचा माहोल असून या पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आहे. आगामी काळात सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईमध्ये उपद्रवी गुन्हेगारांच्या वर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत.
मंडळ अधिकाऱ्यास धक्काबुक्की
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात मंडळ अधिकाऱ्यास धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला होता. जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात वढोडा शिर्साड रोडवर सायंकाळच्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करत असतानाचे ट्रॅक्टर यावल येथील मंडल अधिकारी बबिता चौधरी (Babita Chaudhari) यांना आढळून आले होते. त्यांनी त्याचा पाठलाग करत, चालकाकडून चावी हस्तगत करत, त्या ट्रॅक्टरवर जाऊन बसल्या होत्या. यावेळी ट्रॅक्टर चालक त्यांना कारवाई करू नका, अस सांगत होता. मात्र कारवाई करण्यावर त्या ठाम असल्याचं लक्षात आल्यावर चालकाने त्यांना थेट ट्रॅक्टरवरून खाली फेकून देत पलायन केले. या घटनेनंतर यावल पोलिसात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात विनयभंगासह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर महत्वाची बातमी :