Ahmednagar sand Depo : घर बांधण्यासाठी महत्वाची असणाऱ्या बांधकाम साहित्यातील वाळू (Sand) आता घरपोच मिळणार आहे. यापूर्वी सहा ते सात हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू अवघ्या सहाशे रुपयांत घरपोच मिळणार आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अवैध वाळू उपसा करण्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. 


राज्यात भाजप शिंदे सरकार (Maharashtra Government) आल्यानंतर सरकारने नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली होती. त्यानुसार आता या घोषणेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथून या नवीन वाळू डेपोचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी स्थानिक नागरिक मंगल व्यवहारे या पहिल्या लाभार्थी ठरल्या. राज्यातील हा पहिला वाळू डेपो असणार आहे. नवीन वाळू धोरणांनुसार सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपये ब्रास वाळू खरेदी करता येणार आहे. महाराष्ट्र दिनापासून या धोरणाला सुरवात करण्यात आली आहे. 


या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि,  महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) ऐतिहासिक धोरणाची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार 600 रुपये ब्रास वाळू व वाहतुकीचे दर सुद्धा किमी प्रमाणे ठरवले आहेत. तर किमी प्रमाणे वाहतूक खर्च घेण्यात येणार आहे. त्याप्रमणे 1000 रुपयाच्या आतच वाहतुकीसह 1 ब्रास वाळू मिळेल. त्यासाठी सर्व राज्यातील जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्यात 10 मे पर्यंत सगळीकडे सुरू करण्याचा विचार असल्याचे विखे पाटील म्हणाले. ज्या ठिकाणी हरितलवादाचे निर्णय आहेत किंवा इको सेनेस्टिव्ह झोन आहेत. तिथे सुद्धा याच दराने वाळू उपलब्ध करून देणार असून यासाठी नागरिकांनी ऑनलाईन वाळू बुक करता येणार असून घरपोच वाळू मिळणार आहे. जर कोणी अवैध वाळू उपसा केला तर थेट मोक्का कारवाईचे आदेश दिले असल्याचे विखे पाटील म्हणाले. .


ऑनलाईन बुक करता येणार 


राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. येत्या महाराष्ट्र दिनी या धोरणाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून मोबाईल ॲपच्या माध्यमातून रेती/वाळू सर्वसामान्यांना एका क्लिकवर मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. अवैध वाळू उपशाला आळा बसण्यासाठी आणि नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलत नवं वाळू धोरण लागू केलं आहे. यामुळे 7 हजार रुपयांपर्यंत विक्री केली जाणारी वाळू राज्यात 600 रुपयांना मिळेल. नव्या धोरणानुसार 600 रुपये प्रती ब्रास किंवा 133 रुपये प्रती मेट्रिक टन अशा दराने वाळू विक्री केली जाणार आहे. या वाळू वाहतुकीचा खर्च नागरिकांना करावा लागणार आहे.