Jalgaon Gold News : देशाच्या अर्थसंकल्पानंतर (Budget 2023) सोन्याच्या दरात घसरण होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. मात्र, सोन्याच्या दरात (Gold Rate) कोणत्याही प्रकारची सवलत अर्थसंकल्पात दिली नसल्याने अर्थसंकल्प जाहीर होताच काही तासांत सोन्याचे दर जीएसटीसह 59,945 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले.
सोन्याचे दर वाढून 24 तास होत नाहीत तोपर्यंत दरात पुन्हा एक हजारांची वाढ होऊन सोन्याचे दर तब्बल 60,900 रूपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात 1850 रूपयांची वाढ झाली आहे.
जागतिक पातळीवर डॉलरच्या संख्येत झालेली वाढ आणि सेंट्रल बँक सध्या मोठ्या प्रमाणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करत असल्याने सोन्याच्या दरात ही वाढ होत असल्याचं सोनं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. तसेच, आगामी काळात अजूनही सोन्याचे दर वाढू शकतील असा अंदाज देखील सोने व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.
जळगावातील सोन्याचे दर
सोन्याचे दर 61 हजार रुपयांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेल्याने अनेक ग्राहकांचं सोन्याचं बजेट बिघडलं आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय. अनेक ग्राहकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहेत. आज हे दर सर्वाधिक उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. त्यातच, सध्या सगळीकडे लगीनसराई सुरु असल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करणं गरजेचं वाटतंय. तसेच, आगामी काळात अजूनही वाढ होण्याची चिन्हे असल्याने ग्राहकांनी भविष्याचा विचार करून सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढवला आहे. यासाठी सुवर्णनगरी जळगावात सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.
पुण्यातील सोन्याचे दर काय आहेत...
पुण्यात सोन्याच्या दरांमध्येदेखील विक्रमी वाढ बघायला मिळत आहे. काल (बुधवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सोने व्यापारी दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने आता बाजारात सोनं चांगलंच महागले आहे. सोन्याच्या या वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. यासाठी अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :