Share Market Updates: शेअर बाजारात आज सुरुवातीपासून मोठी अस्थिरता दिसून आली. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर बाजार बंद होताना (Share Market Closing Bell) मात्र तो सावरल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 224 अंकांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) केवळ 4 अंकांनी घसरला. सेन्सेक्समध्ये आज 0.38 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,932 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये आज 0.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,612 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये आज 222 अंकांची वाढ होऊन तो 40,735 अंकांवर पोहोचला.
आज बाजार बंदल होताना एकूण 1637 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1759 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 122 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना ITC, Britannia Industries, IndusInd Bank, HUL आणि Infosys कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Adani Enterprises, Adani Ports, UPL, HDFC Life आणि Divis Labs च्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज बाजार बंद होताना एफएमसीजी आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली. तर पॉवर, ऑईल अॅंड गॅस, मेटलच्या शेअर्समध्ये एक ते चार टक्क्यांची घसरण झाली. आज बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं.
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी एंटरप्रायझेजच्या शेअर्समध्ये आजही मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. अदानी एंटरप्राजझेसच्या शेअर्समध्ये आज 26.70 टक्क्यांनी घसरण झाली. शेअर्समध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे अदानींच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचं दिसून येतंय.
शेअर बाजाराची सुरुवात आज काहीशा तेजीनं झाली, पण ती तेजी कायम राहू शकली नाही. दुपारपर्यंत शेअर बाजारामध्ये जवळपास 150 अंकांची घसरण झाली होती. बाजार बंद होताना मात्र शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं.
बुधवारी संसदेत अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावरती झाल्याचं दिसून आलं होतं. अर्थसंकल्प मांडल्यानंतर शेअर बाजार सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी वधारला होता. मात्र दुपारपर्यंत त्यामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. बुधवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 158.18 अंकांच्या तेजीसह 59,708.08 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी 45 अंकांच्या घसरणीसह 17,616.30 अंकांवर स्थिरावला होता.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- ITC- 4.76 टक्के
- Britannia- 4.62 टक्के
- IndusInd Bank- 3.27 टक्के
- HUL- 2.35 टक्के
- Infosys- 2.10 टक्के
या शेअर्समध्ये घट झाली
- Adani Enterpris- 26.70 टक्के
- Adani Ports- 6.60 टक्के
- UPL- 6.16 टक्के
- HDFC Life- 4.46 टक्के
- Divis Labs- 2.68 टक्के