Jalgaon Crime News जळगाव : लग्न (Marriage) करण्यासाठी वडील लक्ष घालत नसल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांची हत्या केल्याचा संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime News) घडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द गावात (Piloda Khurd, Yaval taluka) ही घटना घडली आहे. या घटनेत पोलिसांनी (Police) मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल (Case Registered) करून त्यास अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात पिळदा खुर्द गावात सत्तर वर्षीय रतन कोळी (Ratan Koli) आपल्या पत्नी आणि मुलगा देवानंद कोळी (Devanand Koli) यांच्या समवेत राहत होते. मोलमजुरी करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.
विवाहासाठी मुलगा लागला वडिलांच्या मागे
याचदरम्यान मुलगा देवानंद कोळी याचा विवाह (marriage) करून देण्यासाठी मुलगा वडिलांच्या मागे लागला होता. मात्र विवाह जुळत नसल्याने बाप आणि मुलगा यांच्यामध्ये नेहमीच खटके उडून भांडण होत असे.
वडील विवाहास टाळाटाळ करत असल्याचा झाला समज
आपले वडील आपला विवाह करण्यास टाळाटाळ करत असल्याचा समज मुलाने करून घेतला होता. याचाच राग मुलाने मनात धरला होता. त्याने सोमवारी रात्रीच्या सुमारास वडील खाटेवर बसले असताना त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने चार ते पाच वार केले.
मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात
यामुळे वडील रतन कोळी यांना गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी देवानंद कोळीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
रस्त्याच्या वादाचे हाणामारीत रुपांतर अन्...
जळगाव जिल्ह्यातील रिधुरी गावात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन एकाची हत्या करण्यात आली आहे. धनराज वासुदेव सोनवणे (50) असे मयताचे नाव आहे.
तर सतीश सुखदेव सोनवणे (30), आरती सतीश सोनवणे (28) हे जखमी झाले आहे. या प्रकरणी सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे व दीपक युवराज सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या