मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification Result) निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवार 16 जानेवारी रोजी महा पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे 'जनता न्यायालय' असेल. 'सत्य ऐकून विचार करा!' असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय. ही पत्रकार परिषद नेमकी आयोजित करण्याची वेळ का आली आहे? या पत्रकार परिषद असे  कोणते मोठे गौप्यस्फोट  जाणार? पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे सोबत नेमकं कोण असणार? हे प्रश्न सध्या उपस्थित केले जातायत. 


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आज उद्धव ठाकरे महा पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजता वरळी डोम याठिकाणी एका मोठ्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडेल. यामध्ये उद्धव ठाकरे काही महत्त्वाचे खुलासे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर करतील अशी माहिती देण्यात आलीये. उद्धव ठाकरेंसोबत या पत्रकार परिषदेत कायदे तज्ञ सुद्धा बोलवण्यात आलेत. त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही एक प्रकारे जनता न्यायालय असेल असं शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या पत्रकार परिषदेला कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनता देखील उपस्थित राहू शकणार आहे. 


या पत्रकार परिषदेत नेमकं काय होणार?


या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यत्व करुन विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मुद्दे उपस्थित करण्यात येतील. त्याचप्रमाणे 2018 साली शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून समोर ठेवली जाईल. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडे देखील या सगळ्याची प्रत पाठवण्यात आल्याचे पुरावे दिले जातील. 


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुखांचे अधिकार, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची 2013 साली  झालेली निवड याचे दाखले आणि पुरावे या पत्रकार परिषदेत दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आलीये. सोबतच 2013 साली  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा या शिवसेना पक्षात होते आणि या पक्षप्रमुख निवडीच्या वेळी ते सुद्धा उपस्थित असल्याचा पुरावा दाखवला जाईल.  2012 ते 2022 च्या दरम्यान ज्या प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठका झाल्या याचे व्हिडिओ देखील दाखवले जातील. शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेले बदल, पक्षप्रमुखांचे अधिकार  या सगळ्यांची विस्तृत चर्चा या पत्रकार परिषदेत केली जाणार आहे


विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर भाष्य करणार


सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय आणि त्यातील मुद्दे, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय, त्यातील मुद्दे यामध्ये विसंगती आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेत बोट ठेवले जाणार असल्याचं सांगण्यात येणार आहे.   त्यामुळे एकीकडे विधानसभा अध्यक्षांच्या या प्रकरणातील निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने याचिका दाखल करुन लढण्याच्या तयारीत आहे, तसेच दुसरीकडे अशा प्रकारची महा पत्रकार अशा प्रकारची महा पत्रकार परिषद बोलावून जनता न्यायालय म्हणत आपली भूमिका, आपली बाजू जनतेपर्यंत मांडण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते गौप्यस्फोट केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


Rohit Pawar : भाजपसोबत गेल्याने राधाकृष्ण विखेंना व्हायरसची लागण; शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर