Jalgaon Crime News : जळगाव शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर (Saurabh Jewellers) आज पहाटेच्या सुमारास दरोडा (Robbery) घालत लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याची घटना घडली. यामुळे जळगावमध्ये (Jalgaon News) मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत दरोडा घालणारे सहा दरोडे खोर हे सराफ बाजारातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले झाले आहे. पोलीस (Police) दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये पहाटेच्या वाजताच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील शोरूम मधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. 


सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा


यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे सोने बचावले आहे. दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी दुकानाबाहेरील सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक देऊन आणि जिवे मारण्याची धमकी देत गप्प केल्याचे दुकान मालक सौरभ कोठारी यांनी म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune News: मोठी बातमी : पुणे अपघातप्रकरणी देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, बिल्डर पुत्रावर कठोर कारवाईचे आदेश


Lok Sabha Election 2024 : एक नाही, दोन नाही तर तरुणाचं तब्बल आठ वेळा मतदान; व्हायरल व्हिडीओनं देशभरात खळबळ, पाहा VIDEO