मुंबई: बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या 4 बांगलादेशींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दहशतवाद विरोधीपथक जुहू युनिटने चारही जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील पहिल्या दोन जणांनी लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील जोगेश्वरी येथे मतदान केल्याची माहिती समोर आली आहे.  


दहशतवाद विरोधी पथकाने चारही बांग्लादेशींवर कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. सह कलम १२ (१A) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन भारतीय पारपत्र प्राप्त करणाऱ्या खालील नमुद मुळच्या बांगलादेशी इसमांना अटक करण्यात आली.


अटक केलेल्या बांगलादेशींनींकडून पोलिसांनी ते सुरत, गुजरात येथे राहण्यास आहे असे पुरावा प्राप्त केले आहेत. तपासात आरोपींव्यतिरिक्त अन्य ५ जणांनीही बनावट कागदपत्र बनवल्याचे समोर आले असून पोलिस तपास करत आहेत. या आरोपीमधील एक आरोपी या बनावट कागदरपत्रांच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.


कोणला अटक केली?


१. रियाज हुसेन शेख, वय ३३ वर्षे, धंदा इलेक्ट्रिशन, रा.ठी. डी-१/८, यमुनानगर, मिल्लतनगर, लोखंडवाला, अंधेरी (प), मुंबई. (मुळ गाव :- हृदयनगर, ठाणे- बशीरहाट, जिल्हा नोवाखाली, बांगलादेश)


२. सुलतान सिध्दीक शेख, वय ५४ वर्षे, धंदा रिक्षाचालक, रा.ठी. टी-१७३, अंबुजवाडी, आझाद नगर, गेट क्र. ८, मालवणी, मालाड, मुंबई ४०००९५ (मुळ गांव सिनोदी, पो. चंदेहाट, तहसिल बाटोया, जि. सदर नोवाखाली, बांगलादेश)


३. इब्राहिम शफिउल्ला शेख, वय ४६ वर्षे, धंदा भाजी विक्रेता, रा.ठी. रूम नं. २२८, दुसरा मजला, बिल्डींग नं. ५, म्हाडा कॉलनी, माहुल गांव, मुंबई-७४. (मुळ गांवः - साहेबर हाट, कादीरपुर, ठाणा- बेगमगंज, जि. नोवाखाली, बांगलादेश)


४. फारूख उस्मानगणी शेख, वय ३९ वर्षे, रा.ठी. २०६, आर/६ गुलशननगर, ओशिवरा, जोगेश्वरी (प), मुंबई. (मुळ गांवः- कबीर हाट, मोनीनगर, जि. नोवाखाली, बांगलादेशी) अशी या आरोपींची नावे आहेत


इतर बातमी:


मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'