Jalgaon News : जळगाव जिल्ह्यासह मुंबईतील विद्यार्थी रशियातील (Russia) वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी फेरफटका मारत मारला गेले असता लाट आल्याने त्यांचा बुडून मृत्यू (Drown) झाला होता. गेल्या चार दिवसांपासून या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे काम सुरु होते. आपत्ती व्यवस्थापनाला या बुडालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात यश आल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. 


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले पाच विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली होती. यानंतर गेल्या चार दिवसांपासून या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे काम त्या ठिकाणचे आपत्ती व्यवस्थापन करत होते. या आपत्ती व्यवस्थापनाला बुडालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे.


रशियातील शोधकार्य थांबले 


पाच पैकी एका मुलीला वाचविण्यात यश मिळाले आहे. उर्वरित चार विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात असताना हे चारही मृतदेह शोधपथकाला सापडले आहेत. त्यामुळे रशियातील शोधकार्य आता थांबविण्यात आले आहे. तीन ते चार दिवसात हे मृतदेह आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रक्रिया करून जळगावपर्यंत आणले जाणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. 


नेमकं काय घडलं? 


रशिया (Russia) देशातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू (Drown) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे. हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) अशी मृतांची नावे आहेत. 


मृत्यूआधी आई आणि मुलाचे संभाषण


दरम्यान, ही दुर्घटना घडण्याच्या आधी जिशान पिंजारी या विद्यार्थ्याने त्याच्या आईशी संपर्क साधला होता. यावेळी त्याची आतेबहीण जिया पिंजारी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे. हे क्षण जिशान आपल्या आईला दाखवत होता. त्यावेळी जिशानच्या आईने त्यांना लवकर पाण्याबाहेर निघण्यास सांगितले होते. यावर जिशानने आम्ही लगेचच घरी निघतो, असे म्हटले. मात्र आईने आणि मुलाचे संभाषण संपताच अवघ्या काही मिनिटात जिया, जिशान, हर्षल देसले आणि मुंबईतील एक असे चौघे नदीच्या पाण्यात वाहून गेले.


आणखी वाचा 


Nashik News : त्र्यंबकला तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू, नाशिक पुन्हा हादरलं