Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी मुंबईतील एका विद्यार्थ्यासह रशियातील (Russia) वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी फेरफटका मारत मारला गेले असता लाट आल्याने त्यांचा बुडून मृत्यू (Drown) झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आता या विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याआधी एका विद्यार्थ्याचे आपल्या आईसोबत झालेले संभाषण समोर आले आहे. 


हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचा सहकारी विद्यार्थी अभ्यासाच्या फावल्या वेळेत वोल्खोव्ह नदी किनारी समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. यावेळी एक मोठी लाट आल्याने होत्याचे नव्हते झाले. 


आईने पाण्याबाहेर निघण्यास सांगितलं, पण...


ही दुर्घटना घडण्याच्या आधी जिशान पिंजारी या विद्यार्थ्याने त्याच्या आईशी संपर्क साधला होता. यावेळी त्याची आतेबहीण जिया पिंजारी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे. हे क्षण जिशान आपल्या आईला दाखवत होता. त्यावेळी जिशानच्या आईने त्यांना लवकर पाण्याबाहेर निघण्यास सांगितले होते. यावर जिशानने आम्ही लगेचच घरी निघतो, असे म्हटले. मात्र आईने आणि मुलाचे संभाषण संपताच अवघ्या काही मिनिटात जिया, जिशान, हर्षल देसले आणि मुंबईतील एक असे चौघे नदीच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेमुळे जळगावात शोककळा पसरली आहे. 


विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात पाठविण्यासाठी प्रक्रिया सुरू


या घटनेची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांना समजताच त्यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आय.एफ.एस) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना तेथील प्रशासनाशी संपर्क करून दिला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली आहे. तसेच जळगाव जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती केली आहे. रशियन सरकारकडून विद्यार्थ्यांचे मृतदेह पाठविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Kolhapur News : कोल्हापुरात बुडण्याची मालिका सुरुच; आता राधानगरी बॅक वॉटरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू


मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा