एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDvsWI | हेटमायर, होपच्या धडाकेबाज खेळीने टीम इंडियाचा विंडीजकडून आठ विकेट्सने पराभव
हेटमायरनं सलामीच्या शाय होपसह दुसऱ्या विकेटसाठी 218 धावांची निर्णायक भागीदारी रचली. या विजयासह विंडीजनं तीन वन डे सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
चेन्नई : शिमरॉन हेटमायर आणि शाय होपच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं चेन्नईच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियानं दिलेलं 289 धावांचं आव्हान विंडीजनं तब्बल आठ विकेट्स राखून पार केलं. हेटमायर आणि शाय होपच्या शतकांच्या जोरावर विंडीज संघाने विजय प्राप्त केला. हेटमायरनं 106 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह 139 धावा कुटल्या तर होपने 151 चेंडूत 102 धावा केल्या. हेटमायरचं वन डे कारकीर्दीतलं हे पाचवं शतक ठरलं. हेटमायरनं सलामीच्या शाय होपसह दुसऱ्या विकेटसाठी 218 धावांची निर्णायक भागीदारी रचली. या विजयासह विंडीजनं तीन वन डे सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियानं पहिल्यांदा 50 षटकांत आठ विकेट्स गमावत 288 धावांची मजल मारली होती. श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. दोघांनी चौथ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी 144 भागीदारी केली होती. ऋषभ पंत या सामन्यात 69 चेंडूत 71 धावांची खेळी करुन माघारी परतला होती तर श्रेयसने 88 चेंडूत 70 धावा केल्या होत्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या तळातल्या फळीतील फलंदाजांनी संघाला 288 धावांचा टप्पा गाठून दिला होता. वेस्ट इंडिजकडून शेल्डन कॉटरेल, किमो पॉल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2-2 तर कायरन पोलार्ड यांनी एक विकेट घेतली होती.
289 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीज संघाला सुरुवातीला सुनील अंब्रोसच्या रुपाने लवकर धक्का बसला. मात्र यानंतर आलेल्या हेटमायरनं सलामीच्या शाय होपसह विडीजला विजयपथाकडे नेले. हेटमायर बाद झाल्यानंतर शाय होपने आपले शतक पूर्ण केले. त्याने निकोलस पूरन (29) च्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 48 व्या षटकातच विंडीज फलंदाजांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून दीपक चहर आणि मोहम्मद शमीने 1-1 बळी घेतला.1st ODI. It's all over! West Indies won by 8 wickets https://t.co/maMFwbf0hg #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) December 15, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement