फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  यावेळी  डिलिव्हरी अॅप झोमॅटोने ट्विटरवर एका ग्राहकाला दिलेल्या रिप्लायची जोरदार चर्चा सुरु आहे. या ग्राहकाने याबाबत तक्रार करत पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर 'रिजेक्ट झोमॅटो' ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. आता झोमॅटोने याबाबत जाहीर माफी मागितली आहे.


 ग्राहकांने या तक्रारीचे स्क्रिनशॉट सोशल नोटवर्किंग साईट ट्विटरवर  झोमॅटोला टॅग करत पोस्ट केले. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर  Reject_Zomato हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरुवात झाली.   यावेळी कंपनीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले.  त्यानंतर झोमॅटो कारवाईने करत कर्मचाऱ्याला नोकरीवरून  काढून टाकले.


ट्विटरवर चेन्नईच्या एक युजरने @Vikash67456607 ने झोमॅटोकडे तक्रार केली त्यांनी जेवणाची ऑर्डर  न मिळाल्याने कस्टमर केअरला तक्रार केली. त्यानंतर त्याचे झोमॅटोच्या कस्टमर सर्व्हिसशी रिफंड बाबत बोलणे चालू होते. यादरम्यान झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण या कर्मचाऱ्याच्या मते हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे. हे ऐकून ग्राहकाच्या रागाचा पारा चढला आणि त्याने याबाबत तक्रार करत आपल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. 


 






एका ग्राहकाने सांगितले की, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कस्टमर सर्व्हिसने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण हिंदी आपली  राष्ट्रभाषा आहे. या ग्राहकाने याबाबत तक्रार करत पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर 'रिजेक्ट झोमॅटो' ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. आता झोमॅटोने याबाबत जाहीर माफी मागितली आहे.


यानंतर विकासने ट्विट करत लिहिले की. झोमॅटोवर मी जेवण ऑर्डर केले पण ते ऑर्डर पोहचली नाही. कस्टमर केअरचे म्हणणे आहे की, पैसे परत मिळणार नाही कारण मला हिंदी येत नाही. झोमॅटोचे कर्मचाऱ्याच्या मते मी भारतीय असल्याने मला हिंदी येणे आवश्यक आहे. 


त्यानंतर झोमॅटोने याबाबत जाहीर माफी मागितली आहे. झोमॅटोने इंग्रजी आणि तमिळ या दोन्ही भाषेत लिहिले की, आमच्या कर्मचाऱ्यानी ग्राहकाला दिलेल्या वागणूकीबद्दल आम्हाला खेद आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे आम्ही त्याला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्याद्वारे देण्यात आलेली वागणूक ही अत्यंत चूकीची असून आमच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे.