नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खिशाला उद्यापासून कात्री लागणार आहे. कारण, तुमच्या किचनचं बजेट वाढणार आहे. गृहोपयोगी अनेक वस्तूंचे दर वाढणार आहेत.


सर्व प्रकारच्या उत्पन्‍नावरील प्राप्तीकरावर 1 टक्‍का अतिरिक्‍त उपकर (सेस) नव्या आर्थिक वर्षापासून भरावा लागणार आहे. त्याशिवाय अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेले अनेक नवीन करप्रस्ताव रविवारपासून लागू होतील. त्यात शेअर विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर, तीनऐवजी चार टक्के आरोग्य आणि शिक्षण ‘सेस’, ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारांपर्यंत व्याजावर आयकरात सूट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

याशिवाय बहुचर्चित ई-वे बिल प्रणाली लागू होत आहे. 250 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणार्‍या व्यावसायिकांवर कॉर्पोरेट करात कपात करून 30 ऐवजी 25 टक्के करण्यात आली आहे. एनडीए सरकारच्या शेवटच्या संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कररचनेत फारसा बदल केला नव्हता, पण अतिश्रीमंतांवर 10-15 टक्के सरचार्ज कायम ठेवतानाच इतर सर्व प्रकारच्या करयोग्य उत्पन्‍नावरील आरोग्य आणि शिक्षण उपकर लागू केला. पूर्वी तीन टक्के असणारा हा उपकर आता चार टक्के होईल.

नव्या आर्थिक वर्षातील नवे बदल

  • शेअर विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा

  • प्राप्तीकरावर अतिरिक्‍त एक टक्के उपकर भरावा लागणार

  • ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारापर्यंत व्याजावर प्राप्तीकरात सूट

  • ई-वे बिल प्रणालीला प्रारंभ


या वस्तू महागणार

  • मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज

  • टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू

  • फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस

  • परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज

  • टूथपेस्ट, टूथ पावडर

  • सौंदर्यप्रसाधने

  • कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज

  • ट्रक आणि बसचे टायर

  • चप्पल आणि बूट

  • सिल्क कपडा

  • इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड

  • फर्निचर

  • घड्याळं

  • एलसीडी, एलईडी टिव्ही

  • दिवे

  •  खेळणी, व्हीडीओ गेम

  • क्रीडा साहित्य

  • मासेमारी जाळं

  • मेणबत्त्या

  • गॉगल

  • खाद्यतेल

  • टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू

  • शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार


संबंधित बातम्या :

Budget 2018: कर रचनेत बदल नाही, प्रत्येक बिल महागणार!


अर्थसंकल्प 2018 : पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, काय-काय महागलं?