एक्स्प्लोर
ते शहिदांच्या रक्ताची दलाली करत आहेत: राहुल गांधी

नवी दिल्ली: सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजप सरकार शहिदांच्या रक्ताची दलाली करत असल्याचं वादग्रस्त विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, 'आमच्या ज्या जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये आपले प्राण दिले, सर्जिकल स्ट्राईक केलं त्यांच्या खुनाची तुम्ही दलाली करीत आहे. ही गोष्ट अतिशय चूक आहे.' एवढं बोलूनच राहुल गांधी थांबले नाही. तर त्यांनी पंतप्रधान मोदींना सल्लाही दिला. 'लष्करानं आपलं काम केलं आहे, तुम्ही तुमचं काम करा.' सर्जिकल स्ट्राईकनंतर राहुल गांधींनी मोदींचं आधी कौतुकही केलं होतं. सहा दिवसांपूर्वीच राहुल गांधी म्हणाले होते. की, 'जेव्हा पंतप्रधान एका पंतप्रधानासारखं काम करतात तेव्हा मी त्यांचं समर्थन करतो. मी त्यांचे आभार मानतो की, त्यांनी अडीच वर्षात पहिलीच अशी अॅक्शन घेतली आहे जी पंतप्रधानपदाला साजेशी आहे. आणि माझं त्यांना पूर्ण समर्थन आहे.' राहुल गांधींच्या किसान यात्रेचा आज शेवटचा दिवस होता. ही यात्रा 26 दिवस सुरु होती.
आणखी वाचा























