लखनौ : उत्तर प्रदेशातील योगी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फॉर्म्युला तयार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, योगी सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी साडे सोळा हजार कोटींचं कर्ज आणि सुमारे 20 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या विभागांच्या बजेटमधून गोळा करणार आहे. लवकरच या फॉर्म्युलाची घोषणाही होणार आहे.


उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुमारे 36 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

योगी सरकारने लोक निर्माण विभागाला 6100 कोटी, औद्योगिक विकास मंत्रालयाला 35 कोटी, आवास आणि शहर नियोजन विभागाला 1 हजार कोटी, नागरी रोजगार विभागाला 1 हजार कोटी, ग्राम विकास विभागाला 3 हजार कोटी आणि ऊर्जा मंत्रालयाला 1980 कोटी रुपयांचं कर्ज घेण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. योगी सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणाही केली.