Yogi Adityanath Oath Ceremony : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपला सत्ता टिकवण्यात यश मिळाले आहे. यातील महत्त्वाचे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. दरम्यान उद्या (25 मार्च) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सलग दुसऱ्यांदा योगी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज योगी आदित्यनाथ यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.
सध्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळावर मंथन होत असताना आज विधिमंडळाच्या नेत्याची निवड होणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि यूपीचे निरीक्षक अमित शाह लखनौला पोहोचणार आहेत. लखनौमध्ये योगींच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. 25 मार्चला शपथ घेणार्या मंत्र्यांची अंतिम यादी देखील आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
योगींनी घेतली जेपी नड्डा आणि अमित शाह यांची भेट
भव्य शपथविधी सोहळ्याला आता फक्त एक दिवस उरला आहे. त्याआधी आज लखनौमध्ये विधिमंडळाची बैठकही होणार आहे. तिथे योगी यांची विधिमंडळाच्या नेतेपदी औपचारिक निवड होणार आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. काल काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह यांची भेट घेतली होती.
दरम्यान, योगी 2.0 चा शपथविधी उद्या दुपारी 4 वाजता लखनौच्या एकना स्टेडियमवर होणार आहे. त्याची भव्य तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शपथविधी सोहळ्यात पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सुविधांची व्यवस्था करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विस्तृत व्यवस्था करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यासाठी येणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी केवळ उत्तर प्रदेशलाच नाही तर देशातील अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: