नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर आता 60 किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असणार. जर दुसरा टोल आढळला तर तो तीन महिन्याच्या आत बंद करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "देशातील अनेक ठिकाणी 60 किमी अंतराच्या आत टोल आहे. हे चुकीचं आहे. पण पैसे मिळतात त्यामुळे आपल्या खात्याकडून यासाठी परवानगी दिली जातेय. आता मी या सभागृहाला आश्वासन देतो की, देशात असे जे 60 किमी अंतराच्या आतील टोल असतील ते येत्या तीन महिन्यांमध्ये बंद केले जातील."


 




टोलनाक्याजवळ राहणाऱ्या स्थानिकांसाठी टोलमध्ये सूट देण्यात येणार आहे. फक्त आधार कार्ड दाखवून स्थानिकांना पास देण्यात येणार आहे. हा पास दाखवून स्थानिकांना टोलमधून सूट मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात ही योजना लागू करण्यात येणार आहे.


भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते
नितीन गडकरी म्हणाले की, 2024 च्या अखेरपर्यंत भारतातील पायाभूत सुविधा, रस्ते हे अमेरिकेच्या बरोबरीनं असतील, अशी मी खात्री देतो. दिल्लीहून मेरठ चाळीस मिनिटांच्या अंतरावर आहे. मेरठचे लोक कॅनॉट प्लेससला जाऊन आयस्क्रीम खातात आणि पुन्हा घरी परत येतात. त्याचप्रमाणे येत्या डिसेंबरपर्यंत अनेक शहरे दिल्लीपासून केवळ दोन तासांच्या अंतरावर असतील. एवढेच नव्हे तर श्रीनगर ते मुंबईचा प्रवास केवळ 20 तासांचा असेल. 


महत्त्वाच्या बातम्या: