तामिळनाडू : कोरोना काळात एकामागोमाग एक निर्बंधांच्या साखळीने सर्वांच्याच आयुष्याला विळखा घातला. या विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा कहर देशात सुरु असल्यामुळे आता प्रशासनानं काही कठोर पावलंही उचलली. मग तो लॉकडाऊनचा निर्णय़ असो किंवा मग समारंभ आणि कार्यक्रमांवर आणलेली स्थगिती असतो. 


कोरोना काळातील या निर्बंधांमुळे अनेक महत्त्वाची कामं लांबली, बहुसंख्य कार्यक्षेत्र प्रभावित झाली, इतकंच नव्हे तर अनेकांच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार तितक्यातच या कोरोनामुळं ब्रेकही लागला. असंख्य विवाहसोहळे रद्द झाले, काहींनी थोडक्यातच हे कार्यक्रम आटोपते घेतले. पण, या साऱ्यात काही जोड्या अशाही होत्या ज्यांनी या साऱ्यावर अफलातून मार्ग काढत जीवनातील हे दिवसही संस्मरणीय बनवले. 


सध्या अशाच एका जोडीनं त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात जमिनीवर नव्हे, तर थेट हवेत केलीये. अर्थात त्यांनी विमानात लग्न रचलं आहे. सध्या सोशल मीडियावर या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जिथे, काही नातेवाईकांच्या उपस्थितीत ही जोडी विमानातच एकमेकांना हार घालताना दिसत आहे. 


In Pics : महाराष्ट्र पोलीस दलाची पताका थेट माऊंट एव्हरेस्टवर; सांगलीचे सुपुत्र संभाजी गुरव यांनी गाठलं शिखर 


कोरोना संसर्गाचं वाढतं प्रमाण पाहता, मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी 24 मे पासून 31 मे पर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळं मदुराई येथे राहणाऱ्या राकेश आणि दीक्षानं चार्टर्ड प्लेनमध्येल लग्न उरकलं. 






एक विमान भाड्यानं घेत त्यांनी पाहुण्यांची आरटीपीसीआर चाचणी करत, त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर हे लग्न केलं. त्यामुळं ही हा अफलातून विवाहसोहळा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.