Wrestlers Protest:  भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या चौकशीनंतर न्यायालायात देखील अहवाल सादर केला आहे. अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी तक्रार रद्द करण्याचा अहवाल देखील दाखल केला आहे. तर सहा महिला कुस्तीपटूंच्या (Wrestler) बाबतीत पोलिसांनी एक हजार पानांची आरोपपत्र दाखल केले आहे. 


सध्याच्या या परिस्थितीवर साक्षी मलिकने प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'चार्जशीटमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की बृजभूषण सिंह हे दोषी आहेत. परंतु आमच्या वकिलांना कोर्टातून आरोपपत्र मिळाल्यानंतर आरोपांविषयी सविस्तर जाणून घेण्यात येईल. तसेच साक्षीने पुढे म्हटलं की, आधी आम्हाला दिलेली आश्वासनं पूर्ण होतात का हे आम्ही पाहू त्यानंतर पुढची पावलं उचलण्याचा निर्णय घेऊ.' तसेच दिल्ली पोलिसांनी अल्पवयीन मुलींनी तक्रार रद्द करण्याच्या मागणीचा शिफारस देखील आहे. 


आता काय असेल दिल्ली पोलिसांचं पुढचं पाऊल?


सध्य परिस्थिती पाहता आता कुस्तीपटूंच्या मागणीवर दिल्ली पोलिसांची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान दिल्ली पोलीस कुस्तीपटूंच्या विरोधातील तक्रार मागे घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिल्ली पोलीस आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या विरोधातील तक्रार मागे घेऊ शकतात. 


दिल्ली पोलिसांनी 28 मे रोजी कुस्तीपटी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या इतर जणांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच कुस्तीपटूंच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहचवल्या संदर्भात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कुस्तीपटूंची मागणी काय?


केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या अटकेची केली होती. त्याचबरोबर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी देखील कुस्तीपटूंनी यावेळी केली. तसेच कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी महिलेची निवड करण्याबाबत देखील कु्स्तीपटूंनी मागणी केली. बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कुस्ती संघटनेत स्थान देऊ नये आणि 28 मे रोजी कुस्तीपटूंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्हे रद्द करण्याची मागणी देखील यावेळी कुस्तीपटूंनी केली. 


कुस्तीपटूंवर 'या' कलमांअंतर्गत गुन्हा दाखल


दिल्ली पोलिसांनी 28 मे रोजी नव्या संसदेच्या उद्घाटनावेळी भारतीय कलम 147 (दंगल), 149 (बेकायदेशीर जमाव), 186 (प्रशासनाच्या कर्तव्याला अडथळा निर्माण करणे) , 188 (प्रशासनाच्या कर्तव्यांचा अपमान करणे), 332 (प्रशासनाला त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करणे) , 353 (प्रशासनाला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करुन प्राणघातक हल्ला करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Wrestlers Protest: "बृजभूषण सिंह दोषीच, तसं आरोपपत्रात नमूद आहे, पण..."; दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनंतर साक्षी मलिकचं वक्तव्य