Manipur Violence: मणिपूर हिंसेच्या पार्श्वभूमीवर जवळपास 500 राजकीय आणि सामाजिक विश्लेषकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. तसेच या पत्राद्वारे शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती देखील या विश्लेषकांनी केली आहे. या पत्रामध्ये पंतप्रधानांनी या प्रकरणावर मौन सोडून जबाबदारी घेण्याची मागणी देखील या विश्लेषकांनी केली आहे. तसेच या हिंसेला तात्काळ थांबण्याचे आवाहन देखील या पत्राद्वारे करण्यात आले आहे. या हिंसेमुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. तसेच लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं देखील या पत्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच या सर्वांमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रात म्हटलं आहे की, "अनेक प्रकारच्या अफवा पसरल्यामुळे समाजामध्ये हिंसा पसरवण्याचे काम सध्या सुरु आहे, जे अत्यंत खेदजनक आहे. वृत्तानुसार, बहुसंख्य मेईतेई समुदायाने कुकियो समाजीतील लोकांनी त्यांच्या समाजीतील महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच कुकियो या समाजाकडून 'बलात्कार करा, अत्याचार करा’ अशा घोषणा देत जमाव करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील या समाजाने म्हटलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हा हिंसाचार ताबडतोब थांबवण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहोत."
पत्राद्वारे या मागण्या करण्यात आल्या आहेत
- वस्तुस्थिती तपासण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली न्यायाधिकरण स्थापन करण्यात यावे.
- मणिपूरमधील समाजांमध्ये फूट पाडणाऱ्या गोष्टीवर बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात यावा.
- हिंसाचाराच्या सर्व प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्यात यावे.
- स्थलांतर करण्यास भाग पाडलेल्या लोकांना त्यांच्या गावात सुरक्षित परतण्याची हमी देण्यात यावी.
- या हिंसेमध्ये जखमी झालेल्यांना आणि यामध्ये ज्यांची घरे, धान्य इत्यादी गोष्टींचे नुकसान झाले आहे त्यांनी नुकसान भरपाई देण्यात यावी.
"केंद्र आणि राज्याच्या राजकारणामुळे मणिपुरमध्ये हिंसा"
मणिपूरमधील ज्या राजकिय आणि सामाजिक विश्लेषकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे, त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, टकेंद्र आणि राज्य सरकारच्या फुटीरतावादी राजकारणामुळे आज मणिपूरमध्ये हिंसा होत आहे. त्यामुळे आता ही त्यांची जबाबदारी आहे कि त्यांनी ही हिंसा थांबवावी. या हिंसेमुळे 50,000 हून अधिक लोकं 300 हून अधिक निवासित शिबिरांमध्ये राहत आहेत. तर लाखो लोकांचे स्थलांतर झाले आहे. '
मणिपूर हिंसाचारात या विश्लेषकांनी भाजपवर आरोप केले आहेत. तसेच भाजप द्वेष आणि हिंसाचार पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील या विश्लेषकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मणिपूर हिंसेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.