मुंबई : कोरोना काळात रिकामे रस्ते आणि शुद्ध वातावरणाने बर्‍याच जणांना मोहित केले. पण आता जनजीवन पूर्ववत होते आहे, तसं पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची समस्या सुरु झाली आहे. मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि पुणे या चार प्रमुख शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. या शहरात गेल्या सहा महिन्यात वाहतुकीची कोंडी होण्याची समस्या सातत्याने वाढत आहे.


टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स अहवाल काय सांगतो?


टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार, वाहतूक कोंडी मानदंडानुसार मुंबई हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे ट्रॅफिक जाम होणारं शहर बनलं आहे. या यादीत बंगळुरु सहाव्या क्रमांकावर, दिल्ली आठव्या स्थानावर आणि पुणे 16 व्या क्रमांकावर आहे. जर आपण संपूर्ण जगाबद्दल विचार केला तर 2020 मध्ये मॉस्कोमध्ये सर्वाधिक वाहतुकीची समया पाहायला मिळाली. पहिल्या 10 मध्ये भारतातील 3 शहरे येण्याचे मुख्य कारण म्हणजे देश कोरोना संकटातून पूर्वपदावर येत आहे. या व्यतिरिक्त लोक सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी वाहनांसह प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. 2019 च्या वाहतूक कोंडीच्या अहवालावर नजर टाकल्यास बंगळुरु शहर पहिल्या क्रमांकावर होतं तर मुंबई चौथ्या क्रमांक होती. त्याचबरोबर, पुणे पाचव्या क्रमांकावर आणि दिल्ली शहर आठव्या क्रमांकावर होतं.


2020 मध्ये मुंबईत ट्रॅफिकची पातळी 53 टक्के होती, जी 2019 च्या तुलनेत 12 टक्के कमी आहे. दुसरीकडे, जर आपण देशाची राजधानी असलेल्या दिल्लीबद्दल विचार केला तर कोरोना कालावधीनंतरही 2020 मध्ये गर्दीची पातळी केवळ 9 टक्क्यांनी घटली आहे. म्हणजेच, येणार्‍या काळात ही समस्या आणखी वाढेल.


वाहतूक कोंडीची समस्या कशी सोडवावी?


तज्ज्ञांचे मत आहे की ही समस्या अनेक स्तरावर आहे. ट्रॅफिक इंजिनिअरिंगअभावी ट्रॅफिक जाम होतो. या व्यतिरिक्त, सुमारे 70 टक्के साइनएज चुकीच्या पद्धतीने लावलेले असतात, ज्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवते. या व्यतिरिक्त पोलिस, पीडब्ल्यूडी, परिवहन विभाग इत्यादींमध्ये कोणतेही सामंजस्य नाही. अशा परिस्थितीत, एकसमान वाहतूक व्यवस्थापन प्रणाली तसेच उत्तम जंक्शन व्यवस्थापन लागू करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीच्या वापरासही प्रोत्साहन द्यावे लागेल. तरच आपण भविष्यात ट्रॅफिक जॅमच्या समस्येपासून मुक्त होऊ शकू. उबर 2018 च्या अहवालानुसार, 4 मेट्रो शहरांमध्ये ट्रॅफिकच्या भीतीमुळे भारताला वर्षाकाठी 1.44 लाख कोटी रुपयांचे नुकसान होते.