शिकागो : हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमेरिकेतील शिकागोत सुरु असलेल्या विश्व हिंदू संमेलनात शर्मिला टागोर आणि नवाब मंसूर अली खान पतौडी यांचं लग्न 'लव्ह जिहाद' असल्याचं सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे.
काल विश्व हिंदू संमेलनात शर्मिला टागोर आणि नवाब पतौडी खान यांचा फोटो दाखवून त्यांच्या लग्नावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला. शर्मिला टागोर यांच्यासोबत सैफ अली खान, करिना कपूर आणि तैमूर यांचाही उल्लेख यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते. हिंदूंना लव्ह जिहादचा धोका असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या संमेलनात हिंदूंच्या हिताचं रक्षण यावर मान्यवरांची भाषणं होत आहेत.
शर्मिला टागोर यांना विवाहावेळी मुस्लीम धर्म स्वीकारावा लागला होता. लग्नानंतर शर्मिला टागेर यांचं नाव बेगम आयशा सुल्तान ठेवण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
शर्मिला टागोर यांच्या मुलांची नावं देखील अरबी ठेवली गेली, अशी माहिती कार्यक्रमात देण्यात आली. शर्मिला टागोर यांना सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान अशी तीन मुलं आहेत.
संबंधित बातम्या