World Highest Paid Country:  1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन(International Labour Day) आहे. आपली आणि आपल्या कुटुंबाची प्राथमिक गरजा भागवण्यासाठी प्रत्येकजण नोकरी किंवा व्यवसायाचा पर्याय निवडत असतो. त्यातून मिळणारा आर्थिक मोबदला हा कुटुंबाची आणि आपली आर्थिक गरज भागवतो. पण कोणत्या देशांतील नागरिकांना किती पगार दिला जातो याबाबत प्रत्येकालाच कुतूहल असते. जगातल्या बऱ्याच देशात दरमहा किती सरासरी पगार दिला याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. या अहवालानुसार  भारतातील नोकरदारांचा दरमहा सरासरी पगार (Monthly Salary) 50 हजारांपेक्षा कमी असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. या अहवालात भारतासोबतच जगातील इतर देशांतील नागरिकांच्या दरमहा पगाराची माहिती देखील देण्यात आली आहे. या यादीत असे 23 देश आहेत, ज्यांचे सरासरी दरमहा वेतन एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे.


यादीतले टॉप 10 देश


समोर आलेल्या माहितीनुसार, जगातील 10 देश लोकांना सर्वाधिक सरासरी पगार देत आहेत. यामध्ये स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, सिंगापूर, अमेरिका, आइसलँड, कतार, डेन्मार्क, सौदी अरेबिया, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.


या यादीत भारत 'या' स्थानावर 


भारतापेक्षा कमी सरासरी वेतन देण्याच्या यादीत तुर्की, ब्राझील, अर्जेंटिना, इंडोनेशिया, कोलंबिया, बांगलादेश, नायजेरिया, इजिप्त आणि पाकिस्तान हे देश आहेत. दरमहा वेतन देण्याच्या यादीत भारत जगात 65 व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 104 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे, तर चीन 44 व्या क्रमांकावर आहे.


या देशातील लोकांचे सर्वाधिक उत्पन्न 


जगातील असे तीन देश असे आहेत, जिथे नागरिकांना सर्वाधिक पगार मिळतो. त्यांचे सरासरी मासिक वेतन चार लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. स्वित्झर्लंडमधील नागरिकांचा दरमहा सरासरी पगार हा 4,98,567 रुपये आहे, लक्झेंबर्गर्स मधील नागरिकांचे सरासरी मासिक वेतन 4,10,156 रुपये आणि सिंगापूरच्या लोकांना 4,08,030 रुपये दरमहा मिळतात.


जगात दरमहा या देशांत इतका पगार दिला जातो


स्वित्झर्लंड: $6,096 (4,98,567 रुपये)
लक्झेंबर्ग: $5,015 (4,10,156 रुपये)
सिंगापूर: $4,989 (4,08,030 रुपये)
अमेरिका: $4,245 (3,47,181 रुपये)
आइसलँड: $4,007 (3,27,716 रुपये)
कतार: $3,982 (3,25,671 रुपये)
डेन्मार्क: $3,538 (2,89,358 रुपये)
संयुक्त अरब: $3,498 (2,86,087 रुपये)
नेदरलँड: $3,494 (2,85,756 रुपये)
ऑस्ट्रेलिया: $3,391 (2,77,332 रुपये)
नॉर्वे: $3,289 (2,68,990 रुपये)
जर्मनी: $3,054 (2,49,771 रुपये)
कॅनडा: $2,997 (2,45,109 रुपये)
युनायडेट किंगडम: $2,924 (2,39,139 रुपये)
फिनलँड: $2,860 (2,33,905 रुपये)
ऑस्ट्रिया: $2,724 (2,22,782 रुपये)
स्वीडन: $2,721 (2,22,534 रुपये)
फ्रान्स: $2,542 (2,07,894 रुपये)
जपान: $2,427 (1,98,489 रुपये)
दक्षिण कोरिया: $2,243 (1,83,441 रुपये)
सौदी अरब: $2,002 (1,63,731 रुपये)
स्पेन: $1,940 (1,58,660 रुपये)
इटली: $1,728 (1,41,322 रुपये)
दक्षिण आफ्रिका: $1,221 (99,857 रुपये)
चीन: $1,069 (87,426 रुपये)
ग्रीस: $914 (74,749 रुपये)
मॅक्सिको: $708 (57,902 रुपये)
रशिया: $645 (52,750 रुपये)
भारत: $573 (46,861 रुपये)
तुर्की: $486 (39,746 रुपये)
ब्राझील: $418 (34,185 रुपये)
अर्जेंटीना: $415 (33,939 रुपये)
इंडोनेशिया: $339 (27,724 रुपये)
कोलंबिया: $302 (24,698 रुपये)
बांग्लादेश: $255 (20,854 रुपये)
वेनेजुएला: $179 (14,639 रुपये)
नायजेरिया: $160 (13,085 रुपये)
इजिप्त: $145 (11,858 रुपये)
पाकिस्तान: $145 (11,858 रुपये)


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


TCS Jobs: टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारवाढीसोबतच नोकर भरतीची देखील घोषणा