एक्स्प्लोर
उत्तर प्रदेशात प्रेमी युगुलाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग

रामपूर (उत्तर प्रदेश) : रामपूरमध्ये 14 तरुणांच्या टोळीनं मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रामपूरमध्ये एका शेतात दोन मुली आणि एक मुलगा बसलेले होते, तेवढ्यात काही तरूणांची टोळी तिकडे आली. शेतात बसलेल्या या मुला-मुलींना या तिघांनी जबर मारहाण केली. एवढंच नाही तर तिघांमधील एका मुलीसोबत त्यांनी अश्लिल चाळे केले असून तिच्यावर जबरदस्तीदेखील केली. यात पीडित मुलगी बेशुद्ध पडली. तर दुसरीकडे तिच्या मित्रांनी तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही या तरूणांच्या टोळीनं मारहाण केली. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ बनवून या टोळीनं तो सोशल मीडियावर अपलोड केला. ज्याच्यावरून पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांनी याप्रकरणी 14 तरूणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. हा सर्व प्रकर 26 मे रोजी घडला असून त्यातील पीडित मुलगी बेपत्ता आहे. दरम्यान, या सर्व प्रकरामुळे उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शिवाय, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयार केलेला 'अॅन्टी रोमिओ स्कॉड' असतानाही अशा विनयभंगाच्या घटना कशा काय घडतात यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय






















