एक्स्प्लोर
जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदींचं अभियान

नवी दिल्लीः भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांनाही आपल्या उत्साहात सहभागी करुन घेण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपलब्ध करुन दिली आहे. नरेंद्र मोदी अॅप आणि mygov.in या वेबसाईटवरुन जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देता येणार आहेत.
#sandesh2soldiers या हॅशटॅगसह पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माझ्याप्रमाणेच तुम्हीही जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा द्या, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
https://twitter.com/narendramodi/status/789819852793876480
125 कोटी भारतीयांच्या शुभेच्छांनी धाडसी जवानांचं मनोबल वाढण्यास मदत होईल, असं मोदी म्हणाले. शुभेच्छा देण्यासाठी वेबसाईटवर खास ग्रीटिंग आणि इमोजी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असं पीएमओच्या वतीने सांगण्यात आलं.
देश आणि आम्ही तुमच्यामुळेच आहोत, अक्षयकडून जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
