Padma Awards 2020: 'पद्म पुरस्कार 2020' मध्ये 7 जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. 16 जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.


जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'पद्मविभूषण'ने सन्मानित करण्यात आले. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगाई(मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


https://twitter.com/i/events/1457598733273612288?s=20 


2020 सालासाठी जाहीर झालेल्या देशातील मानाच्या पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रनौत, गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आयसीएमआरचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. बीजमाता राहीबाई पोपरे यांचादेखील पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.


Padma Awards 2021 : राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण, पाहा फोटो


पद्मविभूषण पुरस्काराने केले सन्मानित
कर्नाटकचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ बेल्ले मोनप्पा हेगडे, भारतीय इस्लामिक विद्वान आणि कार्यकर्ते मौलाना वहिदुद्दीन खान, पुरातत्वशास्त्रज्ञ बीबी लाल यांना देखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय एकूण 10 जणांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


ST Workers Strike : एसटी आंदोलनाला जोर, 250 पैकी 220 डेपोतील कामकाज ठप्प, मनसेचाही पाठिंबा


बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंधूने दोन वेळेस ऑलिम्पिक पदक जिंकले होते. मागील वर्षातील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक मान्यवर राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. एअर मार्शल डॉ. पद्मा बंदोपाध्याय यांना वैद्यक क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. 


Demonetization : नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण होत असताना नागरिकांकडची रोकड उच्चांकी स्तरावर


Cm Uddhav Thackeray : पालखी मार्गावरील अडथळे दूर करणे आपली जबाबदारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे