एक्स्प्लोर

विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात 'या' खडतर परीक्षांचा सामना करावा लागणार

आज अभिनंदन यांना वायुसेनेच्या नियमांनुसार 'डीब्रिफिंग' आणि 'बग स्कॅनिंग' चा सामना करावा लागणार आहे. यामध्ये सेना आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहे. यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप होईल.

नवी दिल्ली :  भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान शुक्रवारी रात्री 60 तासांच्या नंतर भारतात परतले. अटारी वाघा बॉर्डरवरुन त्यांना वायुसेनेने हेलिकॉप्टरने दिल्लीत आणले आहे. आज अभिनंदन यांना वायुसेनेच्या नियमांनुसार   'डीब्रिफिंग' आणि  'बग स्कॅनिंग' चा सामना करावा लागणार आहे. यामध्ये सेना आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहे. यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप होईल.
VIDEO | तब्बल 60 तासांनी भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी | एबीपी माझा
भारतीय वायुसेनेच्या नियमानुसार कमांडर अभिनंदन यांना काही कठीण परीक्षांमधून जावे लागणार आहे. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनंदन यांना भारतात वापसीनंतर काही परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. हे खरतर चांगलं वाटत नाही मात्र, भारतीय वायुसेनेचे नियम आणि कायदे कडक आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या देशात पकडल्यानंतर आपल्या देशात आल्यावर या टेस्टचा सामना करावाच लागतो. याला अन्य कुठलाही पर्याय नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या गोष्टींचा अभिनंदन यांना करावा लागणार सामना 
  1. आज, शनिवारी त्यांच्याशी डीब्रिफिंग होईल. यावेळी वायुसेनेचे अधिकारी त्यांच्याशी पाकिस्तानात घालवलेल्या वेळेबद्दल विचारपूस करतील. वायुसेनेच्या इंटेलिजन्सची ही डीब्रीफिंग खूप त्रासदायक असते.  वायुसेनेच्या नियमांनुसार हे अनिवार्य असते. यामध्ये दुष्मनांनी पकडलेल्या जवानांकडून कैदेत असताना काही माहिती दिली आहे का? दुष्मनांच्या सेनेने त्यांना त्यांच्या सैन्यात सामावून तर घेतले नाही ना? या गोष्टींवर बारकाईने विचारपूस केली जाते.
  2. यानंतर  विंग कमांडर अभिनंदन यांना काही मेडिकल टेस्टचा सामना करावा लागेल, ज्यामध्ये पूर्ण बॉडी चेकअप देखील होईल.
  3. यानंतर अभिनंदन यांची स्कॅनिंग होईल. ज्यामध्ये पाकिस्तानी आर्मीने काही 'बग' फिट केला आहे का? याबद्दल तपासलं जाईल.
  4. यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सायकॉलॉजिकल टेस्ट देखील होईल. यामध्ये त्यांची मानसिक स्थिती कशी आहे? याची माहिती काढली जाईल.
  5. यानंतर  विंग कमांडर यांच्याशी  इंटेलिजेंस ब्यूरो (IB)आणि रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) सुद्धा चौकशी करेल.
भारताचा ढाण्या वाघ परतला, अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले आहेत. तब्बल 60 तासांच्या प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी डेरेदाखल झाले. अभिनंदन यांच्या पुनरागमनानंतर वाघा बॉर्डरवर एकच जल्लोष झाला. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर तीन दिवसांच्या आत अभिनंदन यांचं भारतात प्रत्यावर्तन करण्यात आलं. त्यांना पाकिस्तानकडून भारताकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेला काहीशी दिरंगाई झाली. तरीही, भारताच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान प्रत्यावर्तन मानलं जात आहे. मायदेशी परतल्याचा मोठा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांनी दिल्याची माहिती अमृतसरमधील अधिकाऱ्यांनी दिली.  वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परत आले. भारतात परतण्यापूर्वी त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. VIDEO | वायूसेनेच्या एअर स्ट्राईकवर शरद पवारांकडून सरकारला सवाल | अकलूज | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Abhijeet Dipke: आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव
आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Embed widget