Wife of Galwan hero joins Indian Army: भारतात देशसेवेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे अनेक शूरवीर आहेत. त्यांनी दिलेले बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी तितकच महत्त्वाचं आहे. पण आता या शहीद जवानांचे कुटुंबदेखील आता देशसेवेसाठी तयार झाले आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यातमध्ये चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्काराचे जवान शहीद झाले. या 20 शूरांपैकी एकाच्या पत्नीने आता भारतीय सैन्यात आपले कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा सिंग यांची शनिवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. पूर्व लडाखमध्ये जिथे भारत आणि चीनचे जवळजवळ तीन वर्षांपासून संबंध बिघडत चालले आहेत अशा भागात त्यांचे पोस्टिंग झाले आहे.
महिला कॅडेट रेखा सिंग, दिवंगत नाईक दीपक सिंग यांच्या पत्नी यांच्या पत्नी आहेत. दीपक सिंह यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही माहिती भारतीय लष्कराने ट्विट करत दिली आहे.
रेखा यांचा विवाह बिहार रेजिमेंटच्या बटालियनचे नाईक दीपक सिंह यांच्याशी झाला होता. दीपक सिंह हे 5 जून 2020 रोजी चीनी सैनिकांशी लढताना गलवान व्हॅलीमध्ये शहीद झाले. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते.
भारतीय लष्कारच्या माहितीनुसार, चीनचे भारतीय सैन्यापेक्षा दुप्पट सैनिक मारले गेले होते. परंतु चीनने त्यांचे केवळ चार चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता.
भारतीय लष्कर सैन्य अधिकारी बनण्यासाठी पात्र असलेल्या महिलांना त्यांच्या दिवंगत पतींच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तसेच त्यांना नवीन सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन देखील करत आहे.
आता लष्करामध्ये महिलांवर पुरुषांच्या बरोबरीने जबाबदारीच्या भूमिका सोपवण्यात आल्या आहेत. लष्करासह, भारतीय सीमा सुरक्षा दलातही महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या