New Rules:  प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदल होतात. नोव्हेंबर महिना संपत आला असून 3 दिवसांनी नवा महिना सुरू होणार आहे. 1 डिसेंबरलाही काही नवे नियम लागू होणारा आहे. 


प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या बदलांच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील परिणाम होत असतो. आज तुम्हाला  डिसेंबरमधील या बदलांची माहिती देणार आहे.


गॅस सिलेंडरची किंमत 


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर त्याचे नवीन दर निश्चित केले जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जारी केले जातात. दरम्यान पेट्रोल-डिझेल, सीएनजी पीएनजीचे वाढते दर पाहता गॅस सिलेंडरची किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.


होम लोन ऑफर 


सणासुदीच्या काळात बहुतांश बँका वेगवेगळ्या होम लोनच्या ऑफर देत असतात. यापैकी अनेकांमध्ये कमी व्याजदर आणि जीरो प्रोसेसिंग फीस चा देखील समावेश असतो. पण, बहुतेक बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर ला संपतात. पण एलआयसी हाऊसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरला संपते


एसबीआय क्रेडिट कार्ड


तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डने EMI वर शॉपिंग करणे महागणार आहे. सध्या, SBI कार्ड वापरण्यासाठी फक्त व्याज द्यावे लागते, परंतु 1 डिसेंबरपासून प्रोसेसिंग फी देखील आकारले जाईल.


UAN-आधार लिंकिंग


तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर असेल, तर 30 नोव्हेंबरपर्यंत आधारशी लिंक करा. 1 डिसेंबर पासून, कंपन्यांना फक्त UAN आणि आधार लिंक असलेल्या कर्मचाऱ्यांचेच ECR म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्मचाऱ्याचा UAN आधार पडताळला नसेल, तर ECR दाखल केला जाणार नाही आणि अशा परिस्थितीत, कर्मचाऱ्याकडून पीएफमध्ये मिळणारे योगदान थांबवले जाऊ शकते.


संबंधीत बातम्या


कपडे धुणे महागणार; साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ


चिअर्स! परदेशी स्कॉच स्वस्त होणार; उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सरकारचा निर्णय


Credit Card Tips: डोळे झाकून क्रेडिट कार्ड वापरताय? हे धोके आधी पाहाच, अन्यथा फटका नक्की!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha