मुंबई : पाकिस्तान (Pakistan) नेहमी दहशतवादाला (Terrorism) खतपाणी घालतं आलं आहे. दहशतवाद्यांना आसरा देत पाकने त्यांना पाठबळ दिलं आहे, मात्र पाकिस्तान हे सत्य कायम नाकारत आलेला आहे. असं असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानातील कुख्यात दहशतवाद्यांच्या मृत्यूमुळे पाकिस्तान दहशतदवाद्यांना आश्रय देत असल्याचं उघड झालं आहे. मात्र, पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा रहस्यमय प्रकारे होत असलेला खात्मा विचार करायला लावणार आहे. 


पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा कोण करतंय?


गेल्या दोन वर्षांमध्ये पाकिस्तान आणि कॅनडा 20 हून अधिक कुख्यात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रहस्यमय पद्धती मारे गेले आहेत. हे कुख्यात दहशतवादी भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये सामील होते. पाकिस्तानने या दहशतवाद्यांना आश्रय देण्यावर कायम नकार दिला आहे. गेल्या दोन वर्षात मृत्यू झालेले दहशतवादी लश्कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद आणि प्रतिबंधित खाल टायगर फोर्स या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.


कुख्यात दहशतवाद्यांची पाकिस्तान आणि कॅनडात हत्या


गेल्या दोन वर्षात भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील अनेक कुख्यात दहशतवादी पाकिस्तान आणि कॅनडामध्ये मारले गेले आहेत. पण, या दहशतवाद्यांना एक-एक करुन नेमकं कोण लक्ष करत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 


अनेक दहशतवादी भारतावरील हल्ल्यांमध्ये सामील


पाकिस्तानच्या भूमीवर एका मागोमाग एक कुख्यात दहशतवादी मारले जात आहेत, पण दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याची बाब मानण्यास पाकिस्तान तयार नाही. मात्र, कुख्यात दहशतवाद्यांच्या हत्येनंतर हे सत्य समोर येत आहे. मारले गेलेल्या दहशतवाद्यांपैकी अनेक दहशतवादी भारतावरील दहशतवादी हल्ले आणि कारवायांमध्ये सामील होते.