एक्स्प्लोर

कोण आहे परशुराम वाघमारे?

परशुरामची पार्श्वभूमी सुद्धा तेवढीच वादग्रस्त आहे. त्याला काही करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय होती. त्यासाठी तो सामाजिक शांतता बिघडवण्याच्या कामात व्यस्त असायचा. मशिदीवर ओम लिहिणे, मंदिरावर चाँद काढणे, स्वतःच पाकिस्तानचा झेंडा रोवून तो नंतर जाळणे अशी कृत्ये तो करायचा.

बंगळुरु : जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणारा अखेर जेरबंद झालाय. बंगळुरुच्या विशेष तपास पथकाने या हत्याकांडाचा पर्दाफाश केलाय. विशेष म्हणजे आपणच गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली त्याने न्यायालयासमोर दिलीय. परशुराम वाघमारे असे मारेकऱ्याचे नाव असून त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळालीय. गौरी लंकेश... बंगळुरूच्या जेष्ठ महिला पत्रकार. विचारवंत आणि पुरोगामी लेखिका. बंगळुरूच्या त्यांच्या घरात घुसून मारेकऱ्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. कोणतेही पुरावे सापडत नसलेल्या या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा तपास अखेर कर्नाटक पोलिसांनी लावला. बंगळुरू एसआयटीच्या पथकाने या आव्हानात्मक खटल्याचा पर्दाफाश केला. आणि पोलिसांच्या हाती लागला गौरी लंकेश यांचा मारेकरी. परशुराम अशोक वाघमारे असं या संशयित आरोपीच नाव आहे. खरं तर त्याने स्वतः न्यायालयात खुनाची कबुली दिल्याने तोच या खुनातला आरोपी ठरलाय. त्याला कर्नाटक पोलिसांनी अटक करून 14 दिवसांची कोठडी मिळवलीय. कोण आहे हा परशुराम वाघमारे? परशुराम अशोक वाघमारे असं त्याचं पूर्ण नाव. वय वर्षे 26. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्याचा तो रहिवासी. बसव नगरात त्याचं घर आहे. आईवडील दोघेही मजुरी करून घर चालवतात. आई भांडे विकते तर वडील मिळेल तिथं काम करतात. एकुलता एक मुलगा असल्याने घरी परशुरामचे लाड व्हायचे. नावाला त्याने बीएससी डिप्लोमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. पण हिंदुत्ववादी विचाराने तो कमालीचा प्रेरीत झाला होता. हिंदुत्वासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्यातच महाराष्ट्रातल्या अमोल काळे याच्याशी त्याचा संपर्क झाला. धर्म रक्षण्यासाठी प्रसंगी जीवही घ्यायची तयारी त्याने केली. बेळगावात डोंगरावर, रानावनात जाऊन मित्रांच्या साथीने एअरगन चालवण्याच प्रशिक्षण घेतलं आणि गौरी लंकेश यांचा काटा काढला. पण एका महिलेला मारलो याचा त्याला नंतर पश्चाताप झाला. परशुरामची पार्श्वभूमी सुद्धा तेवढीच वादग्रस्त आहे. त्याला काही करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय होती. त्यासाठी तो सामाजिक शांतता बिघडवण्याच्या कामात व्यस्त असायचा. मशिदीवर ओम लिहिणे, मंदिरावर चाँद काढणे, स्वतःच पाकिस्तानचा झेंडा रोवून तो नंतर जाळणे अशी कृत्ये तो करायचा. 2012 साली याच सिंदगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात समाजविघातक कृत्ये केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. प्रमोद मुतालिक यांनी श्रीराम सेना काढली, तेव्हा सिंदगी तालुक्यातील श्रीराम सेनेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी तो पार पाडायचा. परशुराम याचं कुटुंब अत्यंत साधं, गरीब आणि कष्टकरी आहे. वडील अशोक आणि आई जानकी हा त्याचा परिवार. गेल्या काही वर्षांपासून त्याचे आईवडील रायचूर जिल्ह्यातील मानवी गावात कामासाठी वास्तव्याला आहेत. परशुराम कॉलेज शिकत असल्याने तो सिंदगी गावातच राहिला. अर्थार्जन करण्यासाठी म्हणून त्याने नेट कॅफे सुरू केला. या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तो लोकांना मिळवून द्यायचा. पण असं काही विपरीत काम करेल याची कल्पना परशुरामच्या आईवडिलांना नव्हती. गौरी लंकेश हत्या प्रकरणात परशुरामला झालेली अटक त्यांच्यासाठी धक्का होता. परशुराम यांच्या दोन अन्य साथीदारांना सुद्धा एसआयटीने ताब्यात घेतलंय. परशुरामने चालवलेल्या बंदुकीतून गौरी लंकेश यांची हत्या झाली हे आता उघड झालंय. पण त्याच्या हाती बंदूक देऊन, त्याचा माथा भडकवणारे सूत्रधार शोधणं त्याहून जास्त महत्वाच आहे. कदाचित त्याची पाळंमुळं दाभोळकर, पानसरे हत्याकांडात रोवली गेली असावीत.

महत्त्वाच्या बातम्या

'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?
अभिजित दिपकेंना विमानतळावर का काढावी लागली रात्र? कोचीतील सीजेपीच्या रॅलीतून घरी परतताना नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Embed widget