एक्स्प्लोर

काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण? सस्पेन्स संपेना, राहुल गांधींसाठी निष्ठावानांकडून प्रयत्न सुरुच

आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राहुल गांधींनी बैठक केली. या बैठकीच्या निमित्तानं सर्व मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशीही विनंती केली आहे. पण या दबावाला राहुल गांधी बळी पडण्याची शक्यता कमी आहे. कुठल्याही परिस्थितीत ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत असं त्यांच्या वर्तुळातले काही नेते सांगत आहेत.

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकील्या पराभवानंतर कॉंग्रेस पक्ष नेमक्या कुठल्या दिशेनं जाणार हे अजूनही ठरलेलं नाही. राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर नवीन अध्यक्ष नेमका कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही संपायला तयार नाही. राहुल गांधी नाही तर मग अध्यक्ष कोण? या एका प्रश्नाचं उत्तर गेल्या महिनाभरापासून काँग्रेस पक्षाला सापडत नाहीये. 25 मे रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधींनी राजीनामा दिला. त्यानंतर आत्तापर्यंत हा पक्ष केवळ चाचपडताना दिसतोय. सुरुवातीला राहुल गांधी पक्षातल्या नेत्यांना भेटायलाही तयार नव्हते. आता ते भेटत आहेत. बैठका करत आहेत. पण तरीही राजीनाम्याच्या निर्णयावर मात्र ते ठाम आहेत. आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राहुल गांधींनी बैठक केली. या बैठकीच्या निमित्तानं सर्व मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशीही विनंती केली आहे. पण या दबावाला राहुल गांधी बळी पडण्याची शक्यता कमी आहे. कुठल्याही परिस्थितीत ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत असं त्यांच्या वर्तुळातले काही नेते सांगत आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बैठकीत चांगली चर्चा झाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतात. राहुल गांधी योग्य निर्णय घेतील, असेही गहलोत म्हणाले. एकीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याचं सत्र सुरु झालं आहे. नाना पटोले यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेस सभेचा राजीनामा दिला, नितीन राऊत यांनीही अनुसुचित जाती सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इतरही काही पदाधिकारी राजीनामे देत आहेत. तर दुसरीकडे काहींनी आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेरच उपोषण सुरु केलं. राहुल यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं हे सांगून आपली निष्ठा दाखवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे. दरम्यानच्या काळात अध्यक्षपदासाठी अनेक नावंही मीडियात येऊन गेली. कधी अशोक गहलोत, कधी पृथ्वीराज चव्हाण, तर कधी सुशीलकुमार शिंदे यांचं. पण अजून तरी कुठल्या नावावर एकमत झालं नसल्याचंच कळत आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच तातडीनं सुटणं आवश्यक आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Delimitation Bill : सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला

Embed widget