एक्स्प्लोर

कोण आहेत कुमारस्वामी?

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप मोठा पक्ष ठरला असला, तरी काँग्रेस आणि जेडीएस (सेक्युलर) एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येते आहे. हे दोन पक्ष एकत्र आल्यास कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरतील. कोण आहेत कुमारस्वामी? एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत. हरदानहल्ली देवेगौडा कुमारस्वामी असे 58 वर्षीय कुमारस्वामींचे संपूर्ण नाव आहे. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना 'कुमारअण्णा' म्हणून ओळखले जाते. कुमारस्वामी यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले आहेत. जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या कुमारस्वामी यांनी 3 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या कालावधीत कर्नाटकच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. 1996 साली रामनगरा जिल्ह्यातील कनकापुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी होत, कुमारस्वामी यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र 1998 साली याच मतदारसंघात पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यावेळी त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला. यावेळी त्यांचा डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यानंतर 1999 साली सथनौर मतदारसंघातून कुमारस्वामींनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळीही ते पराभूत झाले. 2004 साली ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी कुणालाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसच्या धरम सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र हे सरकार येडियुरप्पा आणि स्वत: कुमारस्वामी यांनी खाली खेचलं आणि सत्ता स्थापन केली. दोन्ही पक्षांमध्ये 20-20 महिने विभागणी झाली. त्यावेळी भाजपच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले आणि येडियुरप्पा उपमुख्यमंत्री बनले. पण स्वत:ची टर्म संपल्यावर कुमारस्वामींनी येडियुरप्पांना पाठिंबा देण्यास नकार दिला आणि सरकारमधूनही ते बाहेर पडले. येडियुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून सातच दिवसात राजीनामा द्यावा लागला. खासदार, आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते या संसदीय पदांसोबत त्यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. ते जनता दल (सेक्युलर) पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. कुमारस्वामींनी कोणती पदं भूषवली आहेत? 1996 : 11 व्या लोकसभेत ते निवडून गेले. 2004–08 : कर्नाटक विधानसभेत ते आमदार म्हणून निवडून गेले. फेब्रुवारी 2006 - ऑक्टोबर 2007 : कर्नाटकचे मुख्यमंत्री 2009 : 15 व्या लोकसभेत निवडून गेले. 31 ऑगस्ट 2009 : ग्रामीण विकास समितीचे सदस्य 15 ऑक्टोबर 2009 : अन्न व्यवस्थापन समितीचे सदस्य 31 मे 2013 : कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget