मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव  WhatsApp ने 16 जून ते 31 जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल 30 लाख 27 हजार अकाऊंटवर बंदी आणली आहे. तसेच एकूण 594 अकाऊंटच्या तक्रारी आल्याअसून त्यावर काय कारवाई करायची याचा विचार सुरु असल्याचं WhatsApp ने आपल्या अहवालात स्पष्ट केलंय. त्या आधी 15 मे ते 15 जून या एक महिन्याच्या कालावधीत WhatsApp ने 20 लाख अकाऊंटवर बंदी आणली होती. 


WhatsApp ने जारी केलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भारतीय फोन क्रमांकाची ओळख ही +91 या क्रमांकावरुन केली जाते. ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेंजिग म्हणजे स्पॅमच्या चुकीच्या वापराबद्दल जवळपास 95 टक्के अकाऊंटवर बंदी आणण्यात आली आहे असं WhatsApp ने सांगितलं आहे. जगभराचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी WhatsApp कडून दर महिन्याला सरासरी 80 लाख अकाऊंटवर बंदी आणली जाते असं या अहवालातून स्पष्ट होतंय. 


WhatsApp ने सांगितलं की, 16 जून ते 16 जुलै या काळात अकाऊंट सपोर्ट (137), बॅन अपील (316), प्रोडक्ट सपोर्ट (64), सेफ्टी (32) आणि इतर (45) अशा एकूण 594 अकाऊंटची तक्रार आली असून त्यावर काय कारवाई करायची याचा विचार सुरु आहे. 


WhatsApp चे प्रवक्ता एचटी टेक म्हणाले की, "आमच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आर्टिफिशिएल इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच डेटा अॅनालिसिस, तज्ज्ञांची मदत या सर्व गोष्टींमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाते. देशातील नव्या आयटी कायद्यानुसार, 16 जून ते 16 जुलै या दरम्यानचा दुसरा मासिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील तक्रार निवारण अधिकाऱ्याला आणि कंपनीच्या अधिकृत मेलवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित अकाऊंटवर कारवाई करण्यात आली आहे. "


 



संबंधित बातम्या :