Vaccine Certificate On WhatsApp: आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवर कोरोना लसीचे प्रमाणपत्र काही मिनिटांत सहज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तीन सोप्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपवर मिळालेले कोरोना लसीकरण प्रमाणपत्र जतन करू शकता.


काय आहे संपूर्ण प्रक्रिया
प्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल +91 9013151515 हा नंबर सेव्ह करा
मग व्हॉट्सअॅप चॅट उघडा आणि कोविड प्रमाणपत्र (covid certificate) टाइप करा


ओटीपीची कन्फर्म करा
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर +91 9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल (येथे नमूद करणे महत्वाचे आहे की हा नंबर तुम्ही लस घेताना प्रविष्ट केलेल्या त्याच मोबाईल नंबरवर सेव्ह करावा लागेल.) हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप उघडा. चॅट बॉक्स वर जा आणि covid प्रमाणपत्र टाइप करा. हे टाइप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी मिळेल.


हा OTP व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्येच टाईप करा आणि पाठवा. लक्षात ठेवा की तुम्हाला मिळणारा OTP फक्त 30 सेकंदांसाठी असेल. जर तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.


भारतात लसीकरणाची स्थिती
देशात कोविड 19 लसीकरणाचा नवीन टप्पा 21 जूनपासून सुरू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड 19 लसीचे 52.37 कोटीहून अधिक डोस प्रदान केले गेले आहेत. सध्या आणखी 8,99,260 लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 8 पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, वाया गेलेल्या डोससह एकूण 50,32,77,942 डोस वापरण्यात आले आहेत.


एका आठवड्यात तिसऱ्यांदा 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद
भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. देशात आता दरदिवशी जवळपास 40 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. रविवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,070 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात 24 तासांत 43,910 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.