WhatsApp New Feture : व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी अनेक अपडेटे आणि नवनवीन फिचर आणत असतं. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि सिग्नल या सारख्या चॅटिंग अॅपमध्ये बरेच सोयीस्कर फिचर आहेत. म्हणून व्हॉट्सअॅप  देखील आता आपल्या युजर्सना त्यांच्याप्रमाणेच नवीन फिचर देणार आहे. कंपनी मेसेज रिअॅक्शन फिचरवर काम करत आहे. या फिचरमार्फत युजर्स चॅटमध्ये आलेल्या मेसेजना आपले रिअॅक्शन देणार आहेत. ज्यामुळे युजर्सचा चॅट एक्सपीरिअंस पहिल्यापेक्षा अधिक उत्तम होईल. हे फिचर फेसबुक आणि त्याच्या मॅसेंजर अॅपमध्येही उपलब्ध आहे. सध्या हे फिचर टेस्टिंग मोडमध्ये असून लवकरच युजर्ससाठी लॉन्च केलं जाऊ शकतं. 


रिअॅक्ट करता येणार 


व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट अपडेट्सवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार,  WhatsApp देखील दुसऱ्या अॅप्सप्रमाणे मेसेज रिअॅक्शन फिचर घेऊन येणार आहे. अद्याप यावर इंटरनल टेस्टिंग सुरु आहे. त्यामुळे रेग्युलर युजर्ससोबतच बीटा युजर्सही हे फिचर यूज करु शकणार नाहीत. तसेच फिचर रोलआउट झाल्यानंतर केवळ त्यांनाच दिसेल जे WhatsApp चं लेटेस्ट वर्जन वापरत आहेत. तसेच जुनं वर्जन वापरणाऱ्यांना हे फिचर वापरण्यासाठी WhatsApp अपडेट करावं लागेल. 


सर्वांना वापरता येणार 


WABetaInfo नं यासंदर्भात एक स्क्रिनशॉट देखील पोस्ट केला आहे. ज्यात असं सांगितलं आहे की, हा 'एरर मेसेज' ही याची पहिली पायरी असू शकतो. हे युजर्सना अॅन्ड्रॉईड बीटा बिल्डच्या आतमध्ये मिळाणार आहे. त्यामुळे मेसज रिअॅक्शन फिचर केवळ अॅन्ड्रॉईडपर्यंत लिमिटेड नसून iPhone, वेब  आणि डेस्कटॉप वर्जनसाठीही याचा वापर करु शकणार आहेत. 


बराच कालावधीपासून युजर्सना प्रतिक्षा 


व्हॉट्सअॅप युजर्स बऱ्याच दिवसांपासून या फिचरची मागणी करत होते. युजर्सच म्हणणं होतं की,  रिअॅक्शन इमोजीमुळे चॅट एक्सपिरिअंस अधिक उत्तम होतो. चॅट कोणत्याही मेसेजशिवाय केवळ इमोजीच्या मदतीनं संपवता येतं. कारण बऱ्याचदा कोणत्याही मेसेजचं उत्तर नसतं. यामध्ये केवळ रिअॅक्शन्स असतात. त्यामुळे युजर्सची वाढती मागणी पाहता. व्हॉट्सअॅप लवकरच हे फिचर लॉन्च करु शकतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :