Corona Delta Plus Variant: कोविना विषाणूच्या दुसर्‍या लाटेतून लोकं सावरत असतानाच कोविडच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस झपाट्याने पसरत आहे. नवीन डेल्टा प्लसची बऱ्याच केसेस महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात आढळल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये एकामागून एक संकट आल्याने भितीचं वातावरण दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या.
 
कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे?
कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार म्हणजेच B.1.617.2 प्रथम भारतात आढळला. आता हळूहळू इतरही अनेक देशांमध्ये त्याची प्रकरणे चर्चेत येत आहेत. कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदलांमुळे, डेल्टा प्लस प्रकार तयार झाला आहे. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे. ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.


जलद गतीने पसरतोय डेल्टा प्लस व्हेरियंट
कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटमध्ये सर्वात धोकादायक गोष्टी म्हणजे तो आतापर्यंतच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वात वेगवान पसरत आहे. अल्फा प्रकारही वेगवान पसरत असला तरी, डेल्टा प्रकार 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. डेल्टा प्रमाणेच कप्प्या व्हेरियंटही लसीला चकवा देण्यात यशस्वी झाला आहे. मात्र, हा प्रकार फारसा पसरला नाही. पण, आता सुपर-स्प्रेडर डेल्टा व्हेरियंटने लोकांना घाबरवले आहे.


कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारची लक्षणे



  • कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटमध्येही बरीच लक्षणे दिसू लागली आहेत.

  • कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा.

  • कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अशा लक्षणांचा समावेश आहे.

  • याशिवाय त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल यासारखे लक्षणेही दिसून येतात.

  • सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार यांचा समावेश आहे.


 


कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट कसा टाळता येईल?



  • घराबाहेर पडताना दुहेरी मास्क घाला.

  • आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा.

  • 20 सेकंद तरी साबणाने आपले हात स्वच्छ धुवा.

  • सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, लोकांपासून 6 फूट अंतर ठेवा.

  • घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण ठेवा.

  • बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.