What Happened on July 25th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 25 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1997 मध्ये के. आर. नारायणन यांनी भारताचे दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्याशिवाय जगातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म झाला होता. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म


इतिहासात 25 जुलै या तारखेला विज्ञानाच्या एका महान आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद आहे. 25 जुलै 1978 रोजी आजच्याच दिवशी जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राउनचा जन्म झाला होता. इंग्लडंच्या ओल्डहॅम जनरल हॉस्पिटलमध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता. त्यावेळी या मुलीला ‘बेबी ऑफ द सेंच्युरी’ असा खिताब देण्यात आला होता. अलीकडच्या काळात भारतामध्येही ‘टेस्ट ट्यूब बेबीची’ संकल्पना रुजू लागली आहे. ‘टेस्ट ट्यूब’ प्रणालीने बाळ जन्माला घालणं ही विज्ञानातील खूप मोठी प्रगती म्हणावी लागेल.  प्रत्येकवर्षी IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्मलेल्या लुईस जॉय ब्राउन यांचा 25 जुलै हा दिवस वर्ल्ड एंब्रियोलॉजिस्ट डे म्हणून साजरा केला जातो.


भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या 


आजच्याच दिवशी 2007 मध्ये भारताला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या. प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. 2007 ते 2012 प्रर्यंत त्या देशाच्या सर्वोच्च पदावर होत्या. प्रतिभाताई पाटील यांनी 1962 ची पहिली निवडणूक लढविली होती. आमदार ते राष्ट्रपती असा त्यांचा सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय प्रवास हा थक्क करणारा आहे. राजकारणात प्रवेश करणाऱ्या आणि निवडणूक लढविणाऱ्या महिलांसाठी प्रतिभाताई यांची कारकीर्द ही प्रेरणादायी ठरली आहे. 


सार्वजनिक काका यांचं निधन -


1880 : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’यांचं निधन आजच्याच दिवशी झालं होतं.  समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी झाला होता.


25 जुलै कोण कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या 


1648 : आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.
1689 : फ्रान्सने इंग्लंडविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
1813 : भारतात प्रथमच बोट शर्यतीची स्पर्धा कोलकाता येथे घेण्यात आली.
1837 : इलेक्ट्रिक टेलीग्राफच्या वापराचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक.
1917 : कॅनडात आयकर लागू झाला.
1919 : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक आणि संगीतकार तसेच, मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्मदिन.
1943 : इटालियन हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीने पदत्याग केला, त्यानंतर राजा व्हिक्टर इमॅन्युएलने मार्शल पिएट्रो बडोग्लिओ यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
1948 : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने भारतीय संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे लक्ष्य गाठून एक विक्रम केला.
1963 : अमेरिका, रशिया आणि ब्रिटनने अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली.
1975 -माजी भारतीय केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रमोद महाजन यांचे पुत्र आणि दूरदर्शन कलाकार आणि माजी वैमानिक राहुल प्रमोद महाजन यांचा जन्मदिन.
1994 : जॉर्डन आणि इस्रायलमधील 46 वर्षांचे युद्ध संपले.
1997 : के. आर. नारायणन भारताचे दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती.
1997 : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची 1995 च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड
1999 : चित्रपट आणि दृक्‌श्राव्य माध्यमातील संगीतासाठी जर्मन सरकारतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार जगविख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना प्रदान.
2000 : एअर फ्रान्स कॉनकॉर्डचे विमान उड्डाणानंतर लगेचच एका हॉटेलवर कोसळले. या अपघातात १०९ प्रवाशांशिवाय हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या चार जणांनाही आपला जीव गमवावा लागला.