Plane Crash: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे रविवारी मोठा विमान अपघात टळला आहे. एक विमान विमानतळावर उतरण्यापूर्वीच बैसाखी वादळात अडकले होते. वादळात विमान अडकल्यानंतर त्याच्या केबिनचे सामान खाली पडू लागले आणि त्यामुळे विमानातील 40 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटच्या बोईंग 737 विमानाने मुंबईहून दुर्गापूरच्या अंदल येथील काझी नजरुल इस्लाम विमानतळावर उड्डाण केले. शनिवारी विमान बैसाखी वादळात अडकले असताना विमानतळावर उतरणार होते. यावेळी वादळामुळे विमान हवेतच चकरा मारत होते. यादरम्यान विमानाच्या केबिनमध्ये ठेवलेले सामान खाली पडू लागले.


विमानाच्या केबिनमध्ये ठेवलेले सामान पडल्याने 40 प्रवासी जखमी झाले. विमानाच्या लँडिंगनंतर सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जिथे 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य 30 जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताबाबत स्पाइसजेटनेही निवेदन जारी केले आहे. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, फ्लाइट क्रमांक SG-945 ने मुंबईहून दुर्गापूरला उड्डाण केले. वादळात विमान अडकले, त्यामुळे काही प्रवासी जखमी झाले आहेत. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान दुर्गापूरला पोहोचताच जखमी प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. दरम्यान, वादळात अडकल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे, असं बोललं आज आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलं की, याची इमर्जन्सी लँडिंग झालेली नाही. 


महत्वाच्या बातम्या: 


Raj Thackeray On Loudspeakers: 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, भोंग्यांवरून राज ठाकरे यांचा सरकारला इशारा


Temple Demolition: मंदिर पाडणे हा हिंदूंना अपमानित करण्याचा प्रयत्न आहे: प्रवीण तोगडिया


General Manoj Pandey : कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार : मनोज पांडे


Coronavirus : पोटदुखी आणि जुलाबाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ; कोरोनाबाबत डॉक्टरांचा इशारा 

राष्ट्रगीत गाऊन पंतप्रधान मोदींचे मन जिंकणाऱ्या टांझानियाच्या काइली पॉलवर प्राणघातक हल्ला