Coronavirus : दोन महिन्यांपासून कोरोनातून थोडाफार दिलासा मिळाला असताना आता पुन्हा एकदा देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, त्यात अचानक वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये नवीन लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना या नवीन लक्षणांबद्दल सावध केले आहे.


स्क्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या  रूग्णांमध्ये आता पोटदुखी आणि जुलाबाची समस्या दिसून येत आहे. या पूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेमध्ये रुग्णांना ताप, सर्दी, अंगदुखी आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसत होती. परंतु, आताच्या रूग्णांमध्ये पोटदुखी आणि जुलाबाची लक्षणे दिसत आहेत.  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नवीन रूग्णांमधील 20 टक्के रुग्णांना जुलाबाच्या तक्रारी आहेत.  
 
जुलाबाची तक्रार मुलांमध्ये सर्वाधिक दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणत्याही विषाणूजन्य संसर्गाने ग्रस्त असताना मुलांमध्ये अतिसार ही सर्वात सामान्य तक्रार आहे. यासोबतच काही रुग्णांना जुलाबासह पोटदुखीचा त्रासही होत आहे. याबरोबरच काही रूग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीची लक्षणे आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉनच्या BA.2 प्रकाराने संक्रमित लोकांमध्ये पोटाशी संबंधित समस्या दिसून येत आहे. ओटीपोटात दुखणे आणि अतिसार यांसारखी बहुतेक लक्षणे दिसू शकतात. यासोबतच काही कोरोना रुग्णांना झोप न लागणे, लक्ष विचलित होणे इत्यादी समस्या दिसू शकतात.


तज्ज्ञांनी सांगितलेली यातील कोहणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कोरोना चाचणी तरा. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर कोरोना नियामांचे पालन करून स्वत: ला अलगीकरणात ठेवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.  दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,324 नवीन रूग्ण आढळले आहेत. तर 40 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी राज्यात  155 रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या  998 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नागी. राज्यात गेल्या 24 तासात  135  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


महत्वाच्या बातम्या


Jayant Patil : राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी, जयंत पाटलांचे आवाहन