kili paul : राष्ट्रगीत गाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन जिंकणाऱ्या टांझानियाच्या काइली पॉलवर प्राणघातक हल्ला झाला आहे. इन्स्टाग्रामवरून त्याने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी आपल्यावर काही लोकांनी प्राणघातत हल्ला केला आहे. लोक मला झुकवण्याच प्रयत्न करत आहेत. परंतु, परमेश्वर नेहमीच माझी मदत करतो, असे पॉल याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने हल्ला झाल्यानंतर रूग्णालयात उपचार घेत असतानाचे काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  






केवळ टांझानियातच नाही तर भारतासह जगातील इतर देशांमध्येही पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल हिने लिप सिक केलेली बॉलिवूडची गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. काइली पॉल आणि नीमा पॉल भारतीयांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. भारतीय गाण्यांचे आणि संवादांचे व्हिडीओ लिप सिंक करून हे दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही पॉलला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. नुकतेच त्याने साऊथ चित्रपटांचे डायलॉग आणि अॅक्शन सीनचे अनेक व्हिडिओही बनवले आहेत. 


या भावा-बहिणींची भारतात तर एवढी लोकप्रियता आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या  क्रिएटिविटीचे कौतुक केले आहे. यावर्षी 26 जानेवारी रोजी काइली आणि नीमा यांनी लिप सिंकिंगद्वारे भारताचे राष्ट्रगीत गाऊन भारतीयांनी मने जिंकली आहेत. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी या दोघांचे कौतुक केले होते. 


काय म्हणाले होते पंतप्रधान? 


“कायली पॉल आणि निमा ही टांझानियन भावंडं हल्ली फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूपच चर्चेत आहेत. मला खात्री आहे की, तुम्ही देखील त्यांच्याबद्दल ऐकले असेल. त्यांना भारतीय संगीताची आवड आहे. त्यामुळेच ते खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या ओठ सिंक करण्याच्या पद्धतीवरून ते किती मेहनत करतात हे दर्शविते.” असे कौतुक पंतप्रधान मोदींनी केले होते. एवढेच नाही तर फेब्रुवारीमध्ये टांझानियाच्या भारतीय दूतावासाने पॉल याचा सन्मान देखील केला होता.