एक्स्प्लोर

West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??

West Bengal Election: बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे.

West Bengal Election: पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी पार पडलेल्या महासंग्रामाचा उद्या (4 मे) रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत केवळ सत्ताच नव्हे, तर राज्याची राजकीय दिशाही ठरणार असल्याने ही लढत अत्यंत अटीतटीची मानली जात आहे. उद्या सकाळी 8 वाजता टपाली मतदानापासून (Postal Ballots) मोजणीला सुरुवात होईल. निकालानंतर होणारा संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील 15 दिवस केंद्रीय सुरक्षा दलांच्या कंपन्या बंगालमध्येच तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम मोदी अमित शाहांसह तब्बल जवळपास 19 राज्यातील नेते ममतांविरोधात प्रचारात होते. केंद्रीय फौजा सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बंगालमध्ये यावेळी अटीतटीची लढत झाली आहे. तृणमूलची जबाबदारी एकहाती ममता बॅनर्जी यांच्याकडेच होती. 

बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान 

बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला आकडा कोणाला धक्का देणार याची सुद्धा उत्सुकता आहे. बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. 

2021 मध्ये काय घडलं होतं?

गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) 215 जागांसह दणदणीत विजय मिळवला होता. भाजपने 77 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले होते.

एक्झिट पोल आणि हाय व्होल्टेज लढती

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार आणि तांत्रिक बिघाडामुळे मालदा आणि मुर्शिदाबादमधील काही केंद्रांवर (अंदाजे 8-10 केंद्रांवर) 3 मे रोजी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले होते.

हाय व्होल्टेज लढती

यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत.

भाजपकडून जोरदार प्रचार 

भाजपने कथित भ्रष्टाचार, ओबीसी आरक्षणातील तफावत, संदेशखाली प्रकरणावरून महिला सुरक्षा, घराणेशाही या मुद्द्यांवरून तृणमूलला लक्ष्य केले.दुसरीकडे ममतांनी 'बंगालची मुलगी' हे भावनिक आवाहन करत केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत होणारा भेदभाव आणि बाह्य शक्तींचे आक्रमण यावर भर दिला. लक्ष्मी भंडार आणि आरोग्य साथी यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा त्यांनी प्रभावी वापर केला.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

बंगालच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. सत्ताधारी  तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगावर 'पक्षपातीपणा'चा आरोप केला. विशेषतः, केंद्रीय सुरक्षा दलांचा (CAPF) वापर करून मतदारांना घाबरवल्याचा आणि मतदानाचे वेळापत्रक भाजपला पूरक केल्याचा आरोप खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला होता.

मतदानाला हिंसाचाराचे गालबोट 

यंदाही बंगालमधील निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले. कूचबिहार आणि उत्तर परगणा या भागात मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही ठिकाणी गोळीबार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. मतदानापूर्वी संदेशखाली येथील महिला अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला होता, ज्याचे पडसाद निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमटत राहिले. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे यांना उलट्यांचा त्रास, डॉक्टरांकडून तपासणी; शिष्टमंडळ अन् मराठा अभ्यासकांची मीडियासमोर चर्चा 
मोठी बातमी! मनोज जरांगे यांना उलट्यांचा त्रास, डॉक्टरांकडून तपासणी; शिष्टमंडळ अन् मराठा अभ्यासकांची मीडियासमोर चर्चा 
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget