नामवर सिंह यांचा जन्म 28 जुलै 1927 रोजी वाराणसीमधील एका छोट्या गावात झाला होता. हिंदी साहित्यमध्ये त्यांनी एमए आणि पीएचडीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1959 मध्ये चकिया-चंदौलीमधून कम्युनिस्ट पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली आहे. पण त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
त्यांनी छायावाद (1955), इतिहास और आलोचना(1957), कहानी : नयी कहानी (1964), कविता के नए प्रतिमान (1968), दूसरी परंपरा की खोज(1982), वाद विवाद संवाद (1989), यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांची मुलाखत असलेले 'कहना न होगा' हे पुस्तक देखील साहित्य जगतात प्रसिद्ध आहे.
ते 1959-60 मध्ये सागर विश्वविद्यालय (म.प्र.) हिंदी विभागात सहायक प्राध्यापक होते. 1960 ते 1965 पर्यंत त्यांनी वाराणसीतून स्वतंत्र लेखन केले. 1965 मध्ये 'जनयुग’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून दिल्लीत काम केले. 1967 पासून त्यांनी 'आलोचना’ त्रैमासिकाचे संपादक सुरु केले होते. वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताना त्यांनी आपली साहित्यसेवा सुरूच ठेवली होती. त्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धाचे कुलाधिपती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
दरम्यान, नामवर सिंह यांना देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवरून श्रद्धांजली अर्पण करून सिंह यांचे निधन ही व्यक्तिगत हानी झाली असल्याचे म्हटले आहे.