Weather Update Today : नववर्षापूर्वी शुक्रवारपासून देशाच्या हवामानात (Weather Forecast) पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात वेगाने थंड वारे (Cold Weather) वाहत आहेत. हवामान विभागाच्या (IMD Weather Update) अंदाजानुसार, थंड वाऱ्यांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.


तापमानात किंचित घट होण्याची शक्यता


दरम्यान, 23 ते 24 डिसेंबर या कालावधीत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून बहुतांश राज्यातील भागात हवामान कोरडं राहील. येत्या काही दिवसांत काही भागात सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. 25 ते 26 डिसेंबरदरम्यान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


'या' भागात आज पावसाची शक्यता


राजस्थान हवामान विभागाच्या मते, नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, काही ठिकाणी हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता फारच कमी आहे. 23 डिसेंबरपासून पुढील एका आठवड्यात देशातील बहुतांश भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तामिळनाडूच्या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती कायम आहे. तसेच, राजस्थानमध्येही आज पावसाची शक्यता आहे.


पुढील 24 तासांत जम्मू-काश्मीर, लडाख,  आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, आयएमडीच्या अंदाजानुसार, 23 आणि 24 डिसेंबर रोजी उत्तराखंडच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये आज दाट धुके पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 


महाराष्ट्रासह उत्तर भारतात थंडीची लाट


उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील पाराही घसरला आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात पारा कमालीचा घसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसर, गेल्या 24 तासांत पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात किमान तापमान 4-8 अंश सेल्सिअस होते आणि बहुतेक उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंडमध्ये होते. आणि अंतर्गत ओडिशा. काही भागांमध्ये ते 8-12 अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळालं.