मुंबई : मे महिना संपत आला तरी देशाच्या अनेक भागात उन्हाला (Summer) कडका कायम आहे. देशभरातील तापमान विक्रमी पातळीवर गेले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यंदा तापमानाचा पारा कमालीचा वाढल्याचं दिसत आहे. मे महिन्यामध्ये तर उन्हाच्या झळा भलत्याचं वाढल्याचं जाणवत आहे. देशासह राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. 

देशातील या 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

इतकंच काय तर आग्रामध्ये सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सोमवारी आग्रा, अजमेर, बारमेर आणि अलवरसह अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. फलोदी येथे सोमवारी 49.4 अंश तापमानाची नोंद झाली. याशिवाय बाडमेरमध्ये 49.3 अंश तापमानाची नोंद झाली असून, ते आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे. महाराष्ट्राती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे सोमवारी 47.1 अंश तापमानाची नोंद झाली होती तर चंद्रपूर शहरात 44.8 अंश तापमानाची नोंद झाली. 

उन्हाळ्या झळा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातील अनेक शहरांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे बाडमेरच्या फलोदीमध्ये पारा 49 अंशांच्या पुढे गेला. त्याचवेळी जैसलमेर, बिकानेर, झाशी, कोटा, पिलानी येथे 48 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवण्यात आलं आहे. आग्रा, भिलवाडा, दतिया आणि गुना येथे पारा 47 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.

हवामान विभागाकडून अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक भागात उष्णतेच्या तीव्र लाटेबाबत इशारा जारी केला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार (IMD), देशातील अनेक राज्यांना 28 मे ते 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये 31 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

उष्णतेपासून दिलासा कधी मिळणार?

येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये येत्या पाच दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

देशातील 10 सर्वात उष्ण शहरे

शहर  तापमान
फलोदी 49.4
बारमेर 49.3
जैसलमेर 48.7
बीकानेर 48.2
झाशी 48.1
कोटा 48.2
पिलानी 48.5
आग्रा 47.8
भिलवाडा 47.4 
दतिया 47.4
गुना 47.2