मुंबई : बिर्याणी (Biryani) खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर, बिर्याणी खाल्ल्याने इतर 178 जणांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केरळमधील ही घटना समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. केरळमधील त्रिशूरमधील एका रेस्टॉरंटमधील बिर्याणी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर 178 हून अधिक लोक आजारी पडले. रेस्टॉरंटच्या बिर्याणीमुळे अनेकांना अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यापैकी एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला पेरींगनमची रहिवासी होती, तिचे नाव उसैबा होते.
बिर्याणी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू
मयत महिलेचं नाव उझैबा असून ती कुटीलक्कडव येथील रहिवासी आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर महिलेला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाला. पोटदुखी आणि उलट्या होत असल्याने तिला त्रिशूर रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यानंतर उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या महिलेसह तिचे दोन नातेवाईकही तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अनेकांना बिर्याणीतून विषबाधा (Food Poisoning)
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात असलेल्या परिंजनम येथील रेस्टॉरंटमध्ये शनिवारी अनेकांनी बिर्याणीवर ताव मारला. त्यानंतर या लोकांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचं समोर आला. त्यामुळे तब्येत बिघडल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनेकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे, एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी रेस्टॉरंट केलं सील
बिर्याणीमधून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेस्टॉरंटला सील केलं. कुझीमंथी नावाच्या डिशसोबत मेयोनीज खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगितलं जातं आहे. कुझीमंथी ही बिर्याणीप्रमाणे असणारी एक लोकल डिश आहे. त्यामुळे लोक आजारी पडले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ रेस्टॉरंट सील केले.
178 लोक आजारी, अनेक जण रुग्णालयात दाखल
बिर्याणी खाल्ल्याने सुमारे 178 लोक आजारी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनेकांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही अनेकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हॉटेल व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई होणार
दरम्यान, बिर्याणीतून विषबाधा झाल्याने हॉटेल व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. या घटनेबाबत कायपामंगलम पोलीस स्टेशन आणि पेरिंजनम पंचायत येथे अधिकृत अहवाल दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे.