Weather Report Cold wave in India : मागील काही दिवसांमध्ये भारतात थंडी वाढली आहे. आता आणखी पुढील पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरुवारी सांगितले. पुढील पाच दिवस पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरातमधील काही भाग आणि उत्तर राजस्थानमध्ये थंडीची गंभीर लाट येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रातही गारठा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून येत्या चार दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सियसने तापमान घसरण्याची शक्यता आहे.
पुढील चार-पाच दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांशी भागांमध्ये, मध्य भारत आणि गुजरातमधील काही भागामध्ये पारा दोन ते चार अंश सेल्सियसने घसरणार असल्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख या भागांमध्ये आधीच तापमान शून्याच्या खाली पोहोचलंय. शिमलामध्ये काल उणे २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालेय. या हिवाळ्यातला शिमल्यातला सर्वात थंड दिवस नोंदवला गेलाय.
हिमाचल प्रदेशमधील लाहुल-स्पिती या भागात बर्फवृष्टी होतेय. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमान कमालीचं घसरलंय. तर तिकडे लडाख भागातही तापमानाचा पारा इतका घसरलाय की तलावही गोठले आहेत. आणि या तलावांवर आईस हॉकी खेळण्यचा आनंद नागरिक घेत आहेत. पुढील काही दिवसात, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि थंडीची ही लाट महाराष्ट्राचाही पारा कमी करेल असा अंदाज आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख या भागांमध्ये तर तापमान शून्याच्याही खाली पोहोचले आहे. शिमलामध्ये काल उणे २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. या हिवाळ्यातला शिमल्यातला सर्वात थंड दिवस नोंदवला गेला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कर्नाटक काँग्रेस आमदाराची विधानसभेत वादग्रस्त टिप्पणी, बलात्कारापासून बचाव करता येत नसेल तर...
- बर्थ सर्टिफिकेटपूर्वी मिळणार आधारकार्ड! लवकरच रुग्णालयात सुरु होणार नावनोंदणी
- ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद, 88 हजार बाधित आढळले, ओमायक्रॉनचा धोका!