Aadhaar Enrolment For Newborns : यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने लहान मुलांना आधारकार्ड देण्याची तयारी सुरु केली आहे. असं झाल्यास चिमुकल्यांना जन्मावेळीच आधारक्रमांक मिळेल. UIDAI कडून याबाबतची चाचपणी सुरु आहे. जर सर्व व्यवस्थित पार पडलं तर लवकरच रुग्णालयात लहान मुलांसाठी आधार नोंदणी सुरु होणार आहे. UIDAI ची योजना यशस्वी ठरल्यास मुलांना बर्थ सर्टिफिकेटपूर्वीच आधारकार्ड असेल. बर्थ सर्टिफिकेट मिळण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो.
UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नवजात मुलांच्या आधारकार्डबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, "मुंलांना जन्मावेळी आधारकार्ड देण्यासाठी आम्ही रजिस्ट्रारसोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहोत. 99.7 टक्के लोकांना आधारकार्ड देण्यात आलं आहे. सध्या देशातील 131 कोटी लोकांकडे आधारकार्ड आहे. आता आम्ही नवजात मुलांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकवर्षी दोन ते अडीच कोटी मुलांचा जन्म होतो. या सर्वांना आधारक्रमांक देण्याची योजना सुरु आहे. मुलांच्या जन्मावेळीच फोटो क्लिक करुन आधारकार्ड देण्याचा आमचा प्रयत्न असेल. "
सौरभ गर्ग म्हणाले की, 'पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रीक ठसे घेतले जात नाहीत. यामुळे त्यांना त्यांच्या पालकांच्या(आई-वडील) आधार कार्डशी जोडले जाते. यानंतर त्यांना आधार नंबर दिला जातो. मूल पाच वर्षांचे झाल्यास त्याच्या बोटांचे ठसे, रेटीना स्कॅन आणि फोटो घेतले जातात. देशभारतील प्रत्येक व्यक्तीला आधार क्रमांक देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी अनेक गावखेड्यात दहा हजार कँप लावण्यात आले होते. त्याठिकाणी अनेकांकडे आम्हाला आधार कार्ड नसल्याचं सांगितलं होतं. 10 हजार कँपच्या माध्यमातून 30 लाख लोकांचं आधार रजिस्ट्रेशन करण्यात आलं.' 2010 च्या आधीर आधारकार्ड सुरु कऱण्यात आला होतं. सर्वात आधी लोकांना आधारशी जोडणं हेच आमचं लक्ष होतं. आता आधारकार्ड अपडेट करणं आमचं लक्ष आहे. जवळपास दहा कोटी लोक प्रत्येकवर्षी आपलं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आधाकार्डमध्ये अपडेट करतात. आतापर्यंत 120 कोटी बँक खात्याला आधारकार्डशी जोडलं गेल्याचेही गर्ग यांनी सांगितलं.
लवकरच मतदान ओळखपत्र आणि आधार होणार लिंक -
केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे. मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तूर्तास आधार क्रमांक लिंक करणे ही बाब ऐच्छिक असणार आहे. त्यासोबत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळेस संधी देण्यात येणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी असलेल्या एक जानेवारीच्या मुदत तारखेमुळे अनेक युवकांना मतदान नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. एक जानेवारी ही तारीख असल्याने दोन जानेवारी व त्यानंतर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार नोंदणी करता येत नव्हती. त्यांना थेट पुढील वर्षाची प्रतिक्षा करावी लागत होती.
संबधित बातम्या :
मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
आधारकार्डमधील एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते साफ, लगेच करा अपडेट