नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 56 हजारांच्या पुढे गेला असून आतापर्यंत 1886 लोकांचा यात बळी गेलाय. मागच्या 24 तासांमध्ये तब्बल 3390 नवीन लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशातचं केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांचं एक महत्वाचं वक्तव्य आलं आहे. आपण कोरोना व्हायरस सोबत जगायला शिकलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मुंबईतील वाढती कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता केंद्राची टीम दर आठवड्याला मुंबईत येणार आहे. आज या टीमसोबत सहसचिव लव अग्रवाल आले होते.


संपूर्ण भारतात तिसऱ्या टाळेबंदीच्या टप्प्यात लोकांचा जीव फारसा रमताना दिसत नाही, प्रत्येकजण कंटाळलाय, लॉकडाउनच्या नावाने बोटं मोडतोय, संयम किती दिवस बाळगायचा अशा चर्चा सध्या व्हाट्सअॅप ग्रुपवर रंगतायत. काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी एक वेबीनारला संबोधित करताना सांगितले की, भारताला कोरोना विषाणूंसोबत जगायला शिकावे लागेल. कारण अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोना हा काही दिवसात संपुष्टात येणार विषय नाही, हळूहळू याचे प्रमाण कमी होईल.


सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचे उरलेले पेपर 'या' तारखांना होणार


मूर्ती यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे सूतोवाच काही दिवसांपूर्वीच केले आहे. अशातचं आता केंद्रीय मंत्रालयाकडूनही तसेच वक्तव्य आल्याने लॉकडाऊन लवकरचं उठवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीशा त्यांच्या मजुरांना स्वीकारायला तयार नाही : बाळासाहेब थोरात


कोरोनाचा विळखा वाढतोय
देशात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आताच्या घडीला देशभरात 56342 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पैकी 1886 रुग्णांचा यात बळी गेलाय. तर, 15539 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनाचा डबलिंग रेट वाढला आहे. दरम्यान, देशात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या 45 दिवसांपासून संपूर्ण भारत बंद असल्याने देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. परिणामी लॉकडाऊन उठवण्यावाचून आता पर्याय उरला नसल्याचे तज्ञांचे मत आहे.


Balasaheb Thorat | गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा त्यांच्या मजुरांना स्वीकारायला तयार नाही : बाळासाहेब थोरात